Breking News
MLC Election 2026 : विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदानBaramati Wastewater Reuse : बारामतीत सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापरPune News : पुण्यात २२ ऑक्टोबरला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’चे जनजागृती सत्रPune Assault Cases : महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; कोरेगाव पार्कमधील घटनाPune Post Office : टपाल विभागाच्यावतीने २७ ऑक्टोबरला पेन्शन अदालतीचे आयोजनYerawada Drainage Pit Death Case : येरवड्यात खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यूPune Fodder Production Plan : पुणे जिल्ह्यात २५ हजार एकरांवर चारा उत्पादनाचे नियोजनPune Police : पुण्यातील १० गुन्हेगारांना तडीपारीचा दणकाPune Water Scarcity Action Plan : संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी त्रैमासिक कृती आराखडा तातडीने सादर करा – अमित पाथरवटPune Cyber Crime : पेन्शनकार्ड नोंदणीची बतावणी, जेष्ठाला ५ लाखांचा गंडा

Pune Courier Fraud Case : सायबर चोरट्यांकडून निवृत्त प्राचार्यांची फसवणूक

Pune Courier Fraud Case

परदेशातून कुरिअर पाठविल्याची बतावणी

marathinews24.com

पुणे – Pune Courier Fraud Case : परदेशात राहणाऱ्या मुलाच्या नावे कुरिअर पाठविण्यात आल्याची बतावणी करुन सायबर चोरट्यांनी एका निवृत्त प्राचार्याची तीन लाख २३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

नुकसान भरपाईच्या नावाखाली धमकावून मोटार चालक तरुणीची लूट – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे निवृत्त प्राचार्य आहेत. ते कोंढव्यातील एनआयबीएम रस्त्यावरील सोसायटीत राहायला आहेत. त्यांचा मुलगा अमेरिकेत राहायला आहे. २१ सप्टेंबर रोजी सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. (Pune Courier Fraud Case) अमेरिकेत राहणाऱ्या मुलाने कुरिअर पाठविले आहे, अशी बतावणी चोरट्यांनी केली. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना कुरिअर कंपनीच्या क्रमांकावर संपर्क साधण्यास सांगितले. संबंधित क्रमांकावर ज्येष्ठ नागरिकाने संपर्क साधला. तेव्हा सायबर चोरट्यांनी कुरिअर कंपनीतील ग्राहक सेवा कक्षातून बोलत असल्याची बतावणी केली.

चोरट्यांनी त्यांना मोबाइलमध्ये एका ॲपचा समावेश करण्यास सांगितले. या ॲपचा समावेश केल्यानंतर चोरट्यांनी त्यांना बँक खात्याची माहिती भरण्यास सांगितले. ही माहिती भरल्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांच्या दोन्ही मोबाइल क्रमांकाचा तांत्रिक ताबा (हॅक) घेतला. बँक खात्याला मोबाइल क्रमांक जोडण्यात आले आहेत. चोरट्यांनी बँक खात्यातून तीन लाख २३ हजार रुपये दुसऱ्या एका खात्यात वळविले. ही बाब तक्रारदार ज्येष्ठ नागरिकाच्या मुलाच्या निदर्शनास आली. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. काेंढवा पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×