Breking News
डिजिटल गोल्ड’मध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने ९४ लाखांची फसवणूकघर खरेदी करुन देण्याच्या आमिषाने ज्येष्ठाची फसवणूकPune Crime : समलैंगिक पतीकडून महिलेचा छळअनुसूचित जातींचे उपवर्गीकरण जातीय जनगणनेनंतरच करावे‘चरणसेवा’ने जपले लाखो वारकऱ्यांचे आरोग्य; ४.९६ लाखांहून अधिक वारकऱ्यांना लाभउपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते बारामती एमआयडीसीमध्ये स्वच्छता अभियानाचा शुभारंभमहिलांची सुरक्षा, सन्मान, आणि स्वातंत्र्य ही सामुहिक जबाबदारी- विजया रहाटकरपुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून १ लाखाहून थकीत कर्जदारांचा तपशील पोर्टलवर अपलोड-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीतरूणाला शेअरमधील गुंतवणूक पडली ५३ लाखांनासराईत दोन किलोमीटर पळाला, बिल्डींगवरही लपला

Pune Crime : समलैंगिक पतीकडून महिलेचा छळ

 Pune Crime

पतीसह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – पती समलैगिंक असल्याचे लपवून विवाह केल्यानंतर महिलेचा शारिरिक आणि मानसिक छळ केल्याच्या आरोपावरुन पतीसह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल (Pune Crime) करण्यात आला. याबाबत एका महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, पती, सासू, जाऊ, तसेच दिराविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

तरूणाला शेअरमधील गुंतवणूक पडली ५३ लाखांना – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ४४ वर्षीय महिलेचा आरोपी पतीशी २००६ मध्ये विवाह झाला होता. पती समलैगिंक असल्याची बाब त्याच्या कुटुंबीयांनी लपवून ठेवली होती. त्यानंतर पती समलैंगिक असल्याचे महिलेच्य निदर्शनास आले. त्याची परपुरुषांशी संबंध असल्याचे उघडकीस आले. पती परपुरुषांना घरी बोलावू लागला. याबाबत महिलेने त्याला जाब विचारला. तेव्हा महिला आणि तिच्या मुलाला घरातून बाहेर काढण्याची धमकी दिली. ‘तू जर तक्रार दिली तर घरात राहायचे नाही. तू घर सोडून जा’, अशी धमकी महिलेला देण्यात आली. मुलाचे भवितव्य, तसेच असुरक्षितपणाची भावना निर्माण झाली. शारिरिक मानसिक छळ करण्यात आला, असा आरोप महिलेने फिर्यादीत केला आहे. पोलीस उपनिरीक्षक राखी कांबळे तपास करत आहेत.

महिलेचा छळ केल्या प्रकरणी गुन्हा

महिलेचा शारिरिक आणि मानसिक छळ करुन तिला काठीने मारहाण केल्या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी पती, सासू, सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती मूळचा अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार गावचा रहिवासी आहे. तो पिरंगुट परिसरात नोकरी करत आहे. विवाहानंतर महिला, पती हे पिरंगुट परिसरात राहत होते. विवाहानंतर शारिरिक आणि मानसिक छळ करुन काठीने मारहाण करण्यात आली, असा आरोपी महिलेने फिर्यादीत केला आहे. पोलीस उपनिरीक्षक सपना दांगट तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×