Breking News
Pune Crime Branch News : दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणारा सराईत गजाआडAmit Shah Pune Visit Traffic Changes : गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर; वाहतूकीत बदलKothrud Newborn Babies Celebration : कोथरुडमधील १ हजारहून अधिक नवजात बालकांचा अनोखा बालदिन सोहळBharat Sasane Pune : मुलांच्या कल्पनाशक्तीला पंख निर्माण करणे महत्त्वाचे-भारत सासणेVishranti Hospital Pune : विश्रांती हॉस्पिटल हे कर्करोग रुग्णांसाठी आशेचा किरण – अ‍ॅडमिरल मनीष होनवाडPune Crime News : पीएमपी प्रवासी महिलेचे दागिने लांबविलेKondhwa Flat Theft Pune : कोंढव्यात ८ फ्लॅटचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्नPune Khadak Police Theft Case : २५ दिवसांत १० हजार किलोमीटरचा प्रवास करून उघडकीस आणला गुन्हाRaghoji Bhangare Freedom Fighter : सह्याद्रीच्या कपारीत गर्जना करणारा आदिवासींचा वाघ: राघोजी भांगरेSugarcane Trash Management : ढेकळवाडी येथे ऊस पाचट व्यवस्थापन कार्यक्रम संपन्न

Pune Crime News : भटक्या श्वानावरुन वाद; दाम्पत्याला मारहाण

Pune Crime News

मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – भटक्या श्वानाला सोसायटीच्या आवारात नेल्याने झालेल्या वादातून दाम्पत्याला मारहाण करण्यात आल्याची घटना मुंढवा परिसरात घडली. खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी दोघांविरुद्ध मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.याबाबत चैतन्य अतुल वज्रमुष्ठी (वय ३१, रा. मोरया क्रिस्टल सोसायटी, केशवनगर, मुंढवा) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुण्यात विद्यार्थ्यांच्या फ्लॅटमधून ६ लॅपटाॅप चोरीला – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तक्रारदाराने भटक्या श्वानाला सोसायटीच्या आवारात नेल्याने आरोपींनी तक्रारदार तरुणाशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर तरुण आणि त्याची पत्नी याबाबतची तक्रार देण्यासाठी दुचाकीवरुन पोलीस ठाण्यात निघाले. दुचाकीस्वार तरुणाला दोघांनी अडवले. ‘श्वानावरुन आमच्या घरातील महिलांना मारहाण का केली?’, अशी विचारणा आरोपींनी केली. आरोपींनी तरुणाच्या डोक्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले.

तरुण आणि त्याची पत्नी जीव वाचविण्यासाठी तेथून पळाले. आरोपींनी तरुणाचा पाठलाग करुन मारहाण केली. तरुणाच्या पत्नीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपींनी तिला मारहाण केली. खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.

धनकवडीत तरुणाचा खुनाचा प्रयत्न

वादातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना धनकवडीतील गुलाबनगर परिसरात घडली. तरुणाचा खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी एकाला सहकारनगर पोलिसांनी अटक केली. निशांत मुकुंद पिसे (वय ४६, रा. सुवर्णा हाईट्स, तळजाई पठार, धनकवडी) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी समाधान प्रभू पवार (वय ४२, रा. नवजीवन मित्र मंडळ, आंबेगाव पठार, धनकवडी ) याला अटक करण्यात आली. याबाबत मुकुंद पिसे (वय ७८) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुकुंद पिसे हे वकील आहेत. त्यांचा मुलगा निशांत यांचा आरोपी समाधान याच्याशी काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. आराेपीचा भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. २२ ऑक्टोबर रोजी निशांत हा धनकवडीतील गुलाबनगर परिसरातून निघाला होता. आरोपीने निशांत यांच्या गळ्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केला. आरोपीने केलेल्या हल्ल्यात निशा्ंत गंभीर जखमी झाला. सहायक पोलीस निरीक्षक मिठारे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×