Breking News
MLC Election 2026 : विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदानBaramati Wastewater Reuse : बारामतीत सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापरPune News : पुण्यात २२ ऑक्टोबरला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’चे जनजागृती सत्रPune Assault Cases : महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; कोरेगाव पार्कमधील घटनाPune Post Office : टपाल विभागाच्यावतीने २७ ऑक्टोबरला पेन्शन अदालतीचे आयोजनYerawada Drainage Pit Death Case : येरवड्यात खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यूPune Fodder Production Plan : पुणे जिल्ह्यात २५ हजार एकरांवर चारा उत्पादनाचे नियोजनPune Police : पुण्यातील १० गुन्हेगारांना तडीपारीचा दणकाPune Water Scarcity Action Plan : संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी त्रैमासिक कृती आराखडा तातडीने सादर करा – अमित पाथरवटPune Cyber Crime : पेन्शनकार्ड नोंदणीची बतावणी, जेष्ठाला ५ लाखांचा गंडा

Pune Cyber Crime : पेन्शनकार्ड नोंदणीची बतावणी, जेष्ठाला ५ लाखांचा गंडा

Pune Cyber Crime

बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – Pune Cyber Crime : बँक ऑफ बडोद्याच्या मुख्य कार्यालयातून बोलत असल्याची बतावणी करत सायबर चोरट्याने जेष्ठाचा विश्वास संपादित केला. त्यांचे पेन्शनकार्ड नोंदणी करण्याच्या बहाण्याने ऑनलाईनरित्या ४ लाख ८१ हजारांची फसवणूक केली आहे. ही घटना ८ ते ९ सप्टेंबर २०२६ कालावधीत पाषाण सुसरोड परिसरात घडली आहे. याप्रकरणी ७० वर्षीय जेष्ठाने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक, बँकखातेधारकासह वापरकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कौटुंबिक छळाला कंटाळून महिलेची आत्महत्या, तिघांना अटक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७० वर्षीय जेष्ठ नागरिक पाषाण नजीक सुस रोड परिसरात राहायला आहेत. ८ सप्टेंबरला सायबर चोरट्याने त्यांना संपर्क करुन बँक ऑफ बडोदा हेड ऑफिसमधून बोलत असल्याची बतावणी केली. (Pune Cyber Crime) तक्रारदाराचे पेन्शन कार्ड रजिस्ट्रेशन करण्याची बतावणी करत सायबर चोरट्याने त्यांच्याकडून बँक खात्याची माहिती घेतली. त्यानंतर त्यांच्या बँकखात्यातील ४ लाख ८१ हजार रूपये दुसर्‍या खात्यात वर्ग करुन फसवणूक केली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक विजय खिल्लारे तपास करीत आहेत.

जेष्ठेच्या गळ्यातील ५० हजारांचे दागिने चोरीला; वाडेबोल्हाई माता मंदीराजवळील घटना

शहराजवळ असलेल्या वाडेबोल्हाई माता मंदीरात दर्शनासाठी गेलेल्या जेष्ठ महिलेच्या गळ्यातील ५० हजारांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरुन नेले. ही घटना १८ ऑक्टोबरला दुपारी साडेबाराच्या सुमारास वाडेबोल्हाई माता मंदीर लोणीकंद परिसरात घडली आहे. याप्रकरणी महिलेच्या मुलाने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि त्यांचे कुटूंबिय १८ ऑक्टोबरला दुपारी लोणीकंद परिसरातील वाडेबोल्हाई मातेच्या दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी तक्रारदाराच्या आईच्या गळ्यातील ५० हजारांचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. काही वेळानंतर महिलेला गळ्यात दागिने नसल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी मुलाला आपल्या गळ्यातील दागिने नसल्याचे सांगितले. त्यानंतर मुलाने लोणीकंद पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस अमलदार जगताप तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×