काळेपडळ, वडगावशेरीत घडल्या घटना
marathinews24.com
पुणे – Pune Domestic Harassment Cases : कौटुंबिक छळाला कंटाळून दोन महिलांनी आत्महत्या केल्याच्या घटना काळेपडळ आणि वडगाव शेरी परिसरात घडल्या आहेत. याप्रकरणी काळेपडळ व चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाल्या आहेत. त्याअनुषंगाने संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दुचाकीच्या धडकेत तरुणाचा मृत्यू – सविस्तर बातमी
लग्नाच्या १६ वर्षांनंतर पत्नीला घटस्फोटाची मागणी करीत तिला मानसिक त्रास देउन पतीने छळ केला. त्यामुळे छळास कंटाळून महिलेने फ्लॅटच्या बाल्कनीतून उडी मारुन आत्महत्या केली आहे. ही घटना २० ऑक्टोबरला सकाळी आठच्या सुमारास हडपसरजवळील काळेपडळ परिसरातील हांडेवाडी रस्त्यावर असलेल्या राहूल इस्टव्यूव्ह सोसायटीत घडली आहे. सौमिता गौतम सावू वय ४१ रा. हांडेवाडी रोड, सातवनगर) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी काळेपडळ पोलिसांनी गौतम विभुतीभूषण सावू वय ४५ रा. सातवनगर) याला अटक केली आहे. गणेशचंद्र कुंडू (वय ७१ रा. रांची ) यांनी फिर्याद दिली आहे.पोलीस उपनिरीक्षक संदीप राउत तपास करत आहेत.
लग्नानंतर काही महिन्यातच सासरच्या मंडळींनी महिलेला माहेरहून पैसे आणण्याचा तगादा सुरू केला. तिचा कौटुंबिक छळ करीत सतत त्रास दिला. त्यामुळे संबंधित महिलेने गळफास घेउन जीवन संपवले आहे. ही घटना १५ ऑक्टोबरला वडगाव शेरीत घडली असून, याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी पतीला अटक केली आहे. सासू व नणंदविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रियंका सुरेश कांबळे वय २३ रा. स्लेलामेरी शाळेजवळ, वडगाव शेरी असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तिचा पती सुरेश शिवाजीराव कांबळे वय २६ रा. वडगावशेरी याला पोलिसांनी अटक केली आहे. शिवाजी वैराळ वय ४२ रा. वडगाव शेरी यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ऑगस्ट २०२४ ते ऑक्टोबर २०२६ कालावधीत महिलेचा छळ केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी एपीआय वर्षा बांबे तपास करत आहेत.




















