जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
marathinews24.com
पुणे – पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रमांतर्गत शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावी, तसेच मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी पुणे जिल्ह्यातील संबंधित गावांमध्ये आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
स्वारगेट ते कात्रज भूमिगत मेट्रो प्रकल्पाच्या कामासाठी वाहतुकीत बदल – सविस्तर बातमी
पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने लागू करण्यात आलेल्या आदर्श आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर तसेच मतदानाच्या दिवशी मतदान केंद्र निश्चित केलेल्या गावांतील आठवडे बाजार बंद ठेवण्याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आदेश दिले आहेत.
ज्या गावांमध्ये आठवडे बाजार बंद राहणार आहेत, त्यामध्ये आंबेगाव तालुक्यातील मौजे पारगाव तर्फे असवसरी बुद्रुक व घेडेगाव, इंदापूर तालुक्यातील मौजे बावडा, खेड तालुक्यातील मौजे राजगुरुनगर आणि बारामती तालुक्यातील मौजे लोणीभापकर या गावांचा समावेश आहे.
मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी संबंधित गावांतील व्यापारी, बाजार समित्या, ग्रामपंचायती आणि नागरिकांनी प्रशासनाच्या आदेशांचे पालन करावे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.




















