Breking News
Pune Crime Branch News : दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणारा सराईत गजाआडAmit Shah Pune Visit Traffic Changes : गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर; वाहतूकीत बदलKothrud Newborn Babies Celebration : कोथरुडमधील १ हजारहून अधिक नवजात बालकांचा अनोखा बालदिन सोहळBharat Sasane Pune : मुलांच्या कल्पनाशक्तीला पंख निर्माण करणे महत्त्वाचे-भारत सासणेVishranti Hospital Pune : विश्रांती हॉस्पिटल हे कर्करोग रुग्णांसाठी आशेचा किरण – अ‍ॅडमिरल मनीष होनवाडPune Crime News : पीएमपी प्रवासी महिलेचे दागिने लांबविलेKondhwa Flat Theft Pune : कोंढव्यात ८ फ्लॅटचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्नPune Khadak Police Theft Case : २५ दिवसांत १० हजार किलोमीटरचा प्रवास करून उघडकीस आणला गुन्हाRaghoji Bhangare Freedom Fighter : सह्याद्रीच्या कपारीत गर्जना करणारा आदिवासींचा वाघ: राघोजी भांगरेSugarcane Trash Management : ढेकळवाडी येथे ऊस पाचट व्यवस्थापन कार्यक्रम संपन्न

Pune Election News : पदवीधर, शिक्षक निवडणूक मतमोजणी अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी मुख्य प्रवेशद्वार

Pune Election News

उमेदवार व प्रतिनिधींना राजवाडा गेटमधून प्रवेश

marathinews24.com

पुणे – Pune Election News : विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेसाठी बालेवाडी येथील श्री छत्रपती शिवाजी क्रीडा संकुलात प्रवेश व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे. मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांना क्रीडा संकुलाच्या मुख्य प्रवेशद्वारातून त्यांच्या वाहनांसह प्रवेश देण्यात येत आहे. तर उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांच्यासाठी राजवाडा गेटमधून प्रवेशाची व्यवस्था करण्यात आली आहे.

भेदभावाचे रुजलेले संस्कार पुसल्याशिवाय स्त्रीवाद आचरणात येणार नाही-डॉ. छाया महाजन – सविस्तर बातमी 

मतमोजणी प्रक्रियेदरम्यान विविध घटकांची ये-जा नियोजित पद्धतीने व्हावी आणि प्रवेश व्यवस्थेत सुसूत्रता राहावी, यासाठी स्वतंत्र प्रवेशमार्ग निश्चित करण्यात आले आहेत. मतमोजणी अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्य प्रवेशद्वारातून वाहनांसह प्रवेश दिला जात आहे. (Pune Election News) उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींना
राजवाडा गेटमधून प्रवेश देण्यात येत असून, त्यांची वाहने राजवाडा गेट ते बालेवाडी मेट्रो स्थानका दरम्यान सर्व्हिस रोडच्या बाजूला व्यवस्था करण्यात आली आहे.

मतमोजणी प्रक्रियेशी संबंधित अधिकारी, कर्मचारी, उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांनी निर्धारित प्रवेशद्वाराचा वापर करावा. प्रवेश व्यवस्थेसंदर्भातील सूचनांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×