गेल्या वर्षी ३२ तास २६ मिनिटे मिरवणूक
marathinews24.com
पुणे – Pune Ganesh Visarjan Procession : शहरात यंदाही विसर्जन मिरवणूक लांबली असून, गेल्या वर्षी विसर्जन मिरवणुकीला ३२ तास २६ मिनिटे वेळ लागला होता. शनिवारी दुपारनंतर लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता, केळकर रस्त्यावरील विसर्जन मिरवणूक सुरू आहे. यंदा विसर्जन मिरवणुकीला किती वेळ लागणार याकडे सामान्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
‘सेवा संकल्प अभियान २०२६’मधून पुणे जिल्ह्यात लोकाभिमुख उपक्रमांना गती – सविस्तर बातमी
विसर्जन मिरवणुकीतील मानाच्या मंडळाचे विसर्जन शुक्रवारी सायंकाळी झाले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ शुक्रवारी दुपारी साडेचारच्या सुमारास विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले. रात्री श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या श्रींचे विसर्जन झाले. Pune (Ganesh Visarjan Procession) त्यानंतर अखिल मंडई मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट, जिलब्या मारुती मंडळ, हुतात्मा बाबू गेणू मंडळ ही मंडळे विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यास मध्यरात्र झाली.
बेलबाग चौकातून ही मंडळे मार्गस्थ झाल्यानंतर पाठीमागील मंडळे लक्ष्मी रस्त्यावरील मुख्य मिरवणुकीत सहभागी झाली. रात्री विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या बहुतांश मंडळांनी ध्वनीक्षेपक यंत्रणेचा वापर केला होता. रात्री बाराच्या सुमारास ध्वनीक्षेपक यंत्रणा बंद झाल्यानंतर मिरवणूक संथगतीने सुरू होते. शुक्रवारी सहाच्या सुमारास पुन्हा ध्वनीक्षेपक सुरू करण्यात आले. त्यानंतर अनेक मंडळे विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाली.
केळकर रस्ता, लक्ष्मी रस्ता, टिळक रस्त्यावरील मिरवणूक दुपारनंतर सुरू होती. गेल्या वर्षी विसर्जन मिरवणुकीला ३२ तास २६ मिनिटे मिरवणूक सुरू होते. गेल्या वर्षी सायंकाळी सहाच्या सुमारास शेवटच्या मंडळाच्या ‘श्रीं’चे विसर्जन झाले.




















