Breking News
MPSC Protest Pune : ‘पुणे बंद करण्याची भूमिका घेत असाल तर पुणेकरच उत्तर देतील’; MPSC आंदोलनावर आमदार डावखरेंचा रोहित पवारांना सल्लाMPSC Protest: एमपीएससी आंदोलनाविरोधात जनहित याचिकाFarmers, Drought : दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूरPune Crime : पुण्याच्या ग्रामदैवताची दानपेटी फोडली, आरोपीला बेड्या630 Special Teachers Felicitation : दिव्यांग विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या विशेष शिक्षकांच्या कार्याचा गौरवVasundhara Pady Dindi : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘वसुंधरा पायी दिंडी’चे प्रस्थानDr Anil Dudhabhate Medical Award : ‘दृष्टीदूत’ डॉ. अनिल दुधभाते यांना मराठवाडा युवा मंचचा वैद्यकीय पुरस्कारSeva Sankalp Abhiyan : ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत बारामतीत महिला आरोग्य, अवयवदान व रक्तदानाबाबत जनजागृतीSonali Kulkarni : चित्रपटाविषयी प्रेक्षकांनी सम्यक प्रतल शोधणे आवश्यक-सोनाली कुलकर्णीPune Crime : भरदिवसा दुचाकीच्या डिक्कीतून दागिने चोरीला

Pune Health Cleanliness Drive : स्वच्छतेतून निरोगी आरोग्य, वृक्षारोपणातून हरित भविष्य!

Pune Health Cleanliness Drive : स्वच्छतेतून निरोगी आरोग्य, वृक्षारोपणातून हरित भविष्य!

सेवा संकल्प अभियान अंतर्गत जिल्हा परिषद आरोग्य विभागाचा स्वच्छता व वृक्षारोपणाचा संकल्प; आरोग्य संस्थांच्या परिसरात ‘स्वच्छता ही सेवा आणि वृक्षारोपण उपक्रमांना वेग

marathinews24.com

पुणे – Pune Health Cleanliness Drive : राज्यात दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत जिल्हा परिषद पुणे आरोग्य विभागामार्फत ‘स्वच्छता ही सेवा’ आणि वृक्षारोपण अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. स्वच्छ परिसर, निरोगी नागरिक आणि हरित पर्यावरण या त्रिसूत्रीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील आरोग्य संस्थांना अधिक स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक बनविण्यावर भर देण्यात येत आहे.

‘सेवा माझे योगदान’ अभियानाला पुणे जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद – सविस्तर बातमी 

आरोग्य आणि स्वच्छता यांचा अतूट संबंध आहे. नागरिकांना आरोग्य सेवा देणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रे, आरोग्य उपकेंद्रे आणि इतर आरोग्य संस्थांचा परिसर स्वच्छ व आरोग्यदायी असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. Pune Health Cleanliness Drive याच उद्देशाने ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत आरोग्य संस्थांच्या परिसरात स्वच्छता मोहीम, परिसराची स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती तसेच स्वच्छतेची सातत्यपूर्ण सवय निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

“स्वच्छता ही सेवा”तून आरोग्याचा संदेश

स्वच्छता ही केवळ परिसर सुशोभित करण्याची बाब नसून ती सार्वजनिक आरोग्याची मूलभूत गरज आहे. अस्वच्छता, साचलेले पाणी आणि कचऱ्याचे अयोग्य व्यवस्थापन यामुळे विविध आजारांना पोषक वातावरण निर्माण होऊ शकते. त्यामुळे आरोग्य विभागामार्फत स्वच्छतेला आरोग्य संरक्षणाचा महत्त्वपूर्ण भाग मानून स्वच्छता अभियानाला प्राधान्य देण्यात येत आहे. आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, आरोग्य सेविका, आरोग्य कर्मचारी तसेच स्थानिक पातळीवरील संबंधित घटकांच्या सहभागातून स्वच्छता उपक्रम राबविण्यात येत आहेत. ‘माझी आरोग्य संस्था – स्वच्छ आरोग्य संस्था’ या भावनेतून प्रत्येक आरोग्य संस्थेचा परिसर स्वच्छ, नीटनेटका आणि नागरिकांसाठी आरोग्यदायी ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

वृक्षारोपणातून हरित आरोग्य संस्थांचा संकल्प

स्वच्छतेसोबतच पर्यावरण संवर्धनाला चालना देण्यासाठी वृक्षारोपण अभियान राबविण्यात येत आहे. आरोग्य संस्थांच्या उपलब्ध परिसरात योग्य ठिकाणी वृक्षारोपण करून परिसर अधिक हिरवाईने नटविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. वृक्ष पर्यावरणाचा समतोल राखण्यासोबतच आरोग्यदायी वातावरण निर्मितीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. त्यामुळे आरोग्य संस्थांच्या परिसरात वृक्षारोपण करून ‘हरित आरोग्य संस्था’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यावर भर देण्यात येत आहे. केवळ वृक्षारोपण करून न थांबता लावलेल्या रोपांचे संगोपन व संवर्धन करण्यावरही विशेष लक्ष देण्यात येत आहे.

स्वच्छता आणि वृक्षारोपणाला लोकसहभागाची जोड

‘सेवा संकल्प अभियान’ हे केवळ शासकीय यंत्रणेपुरते मर्यादित न राहता लोकसहभागातून व्यापक जनचळवळ बनावे, यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. आपल्या घरापासून, गावापासून आणि आरोग्य संस्थेपासून स्वच्छतेची सुरुवात करण्याबरोबरच प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे.“स्वच्छ परिसर म्हणजे निरोगी जीवनाची पहिली पायरी, तर वृक्ष म्हणजे निरोगी भविष्यासाठीची गुंतवणूक,” या संदेशातून स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाची सांगड घालण्यात येत आहे.

स्वच्छ, सुंदर आणि हरित आरोग्य संस्थांकडे वाटचाल

‘सेवा संकल्प अभियान’ Pune Health Cleanliness Drive च्या माध्यमातून स्वच्छता ही सेवा, वृक्षारोपण ही जबाबदारी आणि आरोग्य ही सामूहिक बांधिलकी या भावनेतून जिल्हा परिषद आरोग्य विभाग कार्यरत आहे. आरोग्य संस्थांचा परिसर स्वच्छ ठेवणे, उपलब्ध जागेत वृक्षारोपण करणे, लावलेल्या वृक्षांचे संगोपन करणे आणि नागरिकांमध्ये स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करणे, या माध्यमातून ग्रामीण भागात अधिक आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धन हे केवळ एका अभियानापुरते मर्यादित न राहता दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनावे, यासाठी सर्व नागरिकांनी पुढाकार घ्यावा.

स्वच्छ गाव – निरोगी गाव – हरित गाव’ या संकल्पनेतून लोकसहभाग वाढवून आरोग्यदायी व पर्यावरणपूरक समाजनिर्मितीसाठी योगदान देण्याचे आवाहन जिल्हा परिषद पुणे आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
“स्वच्छता ही केवळ एका दिवसाची मोहीम नसून ती आपल्या दैनंदिन जीवनशैलीचा अविभाज्य भाग झाली पाहिजे. स्वच्छ आरोग्य संस्था, स्वच्छ गाव आणि हरित परिसर यामुळे नागरिकांचे आरोग्य अधिक सक्षम होण्यास निश्चितच मदत होईल. प्रत्येक आरोग्य संस्थेने वृक्षारोपणासोबतच लावलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारावी. ‘स्वच्छता ही सेवा आणि वृक्षारोपण अभियान लोकसहभागातून व्यापक चळवळ बनवून पुणे जिल्हा अधिक स्वच्छ, सुंदर, निरोगी आणि हरित करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे.” -गजानन पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे

“स्वच्छ आरोग्य संस्था ही निरोगी समाजाची पहिली पायरी असून, ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाच्या माध्यमातून आरोग्य संस्थांचे परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. Pune Health Cleanliness Drive स्वच्छतेसोबतच आरोग्य संस्थांच्या परिसरात वृक्षारोपण करून हरित व “आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या उपक्रमाला लोकसहभागाची जोड देत प्रत्येक नागरिकाने स्वच्छता राखण्यासोबतच लावलेल्या वृक्षांचे संगोपन करून स्वच्छ गाव-निरोगी गाव-हरित गाव साकारण्यासाठी योगदान द्यावे.”

-डॉ. रामचंद्र हंकारे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद पुणे

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×