Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

‘पुणे लोकमान्य फेस्टिव्हल’चे दिमाखात उदघाटन

‘पुणे लोकमान्य फेस्टिव्हल’चे दिमाखात उदघाटन

पुणे लोकमान्य फेस्टिवल २४ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबरला पुण्यात रंगणार !

marathinews24.com

पुणे – शहरातील लोकप्रिय अशा पुणे लोकमान्य फेस्टिव्हलची सुरवात ढोल पथकाच्या गजरात झाली आणि देवीची प्राणप्रतिष्ठापना श्री व सौ डॉ. नरेश मित्तल यांच्या हस्ते करण्यात आली. त्यांनंतर पुणे लोकमान्य फेस्टिव्हलचे दिमाखात उदघाटन करण्यात आले. दीपप्रज्वलन करून व आकाशात रंगीबेरंगी फुगे सोडून उद्योजक गोरख सातपुते, शुभांगी सातपुते, महेश महाले, लोकमान्य फेस्टिव्हलचे संस्थापक अध्यक्ष ॲड. गणेश सातपुते यांचे हस्ते सुरवात करण्यात आली.

भारतातील शासकीय शाळांच्या विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप – सविस्तर बातमी 

फेस्टिवलचे हे २८ वे वर्ष आहे. बुधवार दि. २४ सप्टेंबर रोजी जितेंद्र भुरुक प्रस्तुत गीतों का सफर मराठी-हिंदी गाण्यांचा सहकुटुंबानी पहावा असा कार्यक्रम, गुरुवार दि. २५ सप्टेंबर २०२५ मल्हार प्रस्तुत धर्म, परंपरा, संस्कृती जपणारा मराठी गितांचा नृत्त्याविष्कार गर्जना सह्याद्रीची, लोकधारा महाराष्ट्राची सोनाली कोतवाल निर्मित, शुक्रवार दि. २६ सप्टेंबर जगप्रसिध्द जादू‌गार जितेंद्र रघूवीर यांचा कार्यक्रम होणार आहे.

शनिवार दि. २७ सप्टेंबर रोजी सोलो डान्स कॉम्पिटिशन, रविवार दि. २८ सप्टेंबर स्वर संजीवण ‘म्युझिकल’ प्रस्तुत स्वर सम्राज्ञी स्व. लतादीदीच्या ९५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांना दिलेली स्वरांजली गायक: अर्चना पोतनीस, रश्मी बडे, संजय पोतनीस संकल्पना डॉ. भाग्यश्री कश्यप, सोमवार दि. २९ सप्टेंबर रुपान देखणी लावणी सम्राज्ञी माया खुटेगावकर, मंगळवार दि. ३० सप्टेंबर सादरकर्ते-निर्माता: समीर वीर सुरसंगम प्रेझेंट दांडीया विथ लाईव्ह ऑर्केस्ट्रा बुधवार दि. १ ऑक्टोबर ग्रुप डान्स कॉम्पिटिशन, गुरुवार दि. २ ऑक्टोबर दसऱ्यानिमित्त रावणदहन आर्टिस्ट एम. शेखर, सोमवार दि. ६ ऑक्टोबर कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दुग्धपान व तेजस्विनी अँड मुकेश देढिया प्रस्तुत टोटल म्युझिक धमाका असे कार्यक्रम पार पडणार आहे.

या लोकमान्य फेस्टीव्हलचे संस्थापक अध्यक्ष ॲड. गणेश सातपुते असून उत्सवाचे अध्यक्ष नरेश मित्तल आहेत आणि संयोजन महेश महाले, सौ. शुभांगी सातपुते, अदित्य सातपुते, गौरव सैतवाल, ऋषीकेश भोसले, चेतन सोनवणे, इ. करणार आहेत. सदरील सर्व सांस्कृतिक कार्यक्रम लोकमान्यनगर, जॉगिंग पार्क, नवी पेठ, येथे पार पडणार आहेत. सर्व कार्यक्रम पुणेकरांसाठी विनामूल्य असून जास्तीत जास्त पुणेकरांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×