Breking News
Pune Mahalakshmi Temple Gold Saree : सुवर्णवस्त्रांनी सजली सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी देवीMakarand Anaspure : विद्यार्थीपण आहे तोपर्यंतच जगण्याला अर्थ- मकरंद अनासपुरेMLC Election 2026 : विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदानBaramati Wastewater Reuse : बारामतीत सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापरPune News : पुण्यात २२ ऑक्टोबरला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’चे जनजागृती सत्रPune Assault Cases : महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; कोरेगाव पार्कमधील घटनाPune Post Office : टपाल विभागाच्यावतीने २७ ऑक्टोबरला पेन्शन अदालतीचे आयोजनYerawada Drainage Pit Death Case : येरवड्यात खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यूPune Fodder Production Plan : पुणे जिल्ह्यात २५ हजार एकरांवर चारा उत्पादनाचे नियोजनPune Police : पुण्यातील १० गुन्हेगारांना तडीपारीचा दणका

Pune Missing Minor Death : पुण्यातील बेपत्ता अल्पवयीन मुलाचा मृतदेह आढळला

Pune Missing Minor Death

बंडगार्डन हद्दीतून तीन दिवसांपूर्वी झाला होता बेपत्ता

marathinews24.com

पुणे – Pune Missing Minor Death : शहरातील बंडगार्डनच्या हद्दीतून तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या १७ वर्षीय मुलाचा मृतदेह चंदननगर परिसरातील नदीपात्रात आढळून आला. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. शिवकुमार बाबू वखरानी (वय १७ वर्षे ७ महिने, रा. ताडीवाला रस्ता, पुणे) असे मृतदेह सापडलेल्या मुलाचे नाव आहे. मुलाच्या शोधासाठी पोलिसांनी योग्य पद्धतीने तपास केला नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

कुख्यात गुंड निलेश घायवळसह टोळी निर्दोष – सविस्तर बातमी 

शिवकुमार २६ सप्टेंबरला रात्री दहा ते अकराच्या सुमारास घरातून बेपत्ता झाला होता. अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून त्याला पळवून नेल्याची तक्रार त्याच्या आईने बंडगार्डन पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून शिवकुमारचा शोध सुरू केला होता. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असतानाच मंगळवारी (दि. २९) सकाळी साडेआठच्या सुमारास चंदननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नदीपात्रात मुलाचा मृतदेह आढळून आला. चौकशीनंतर हा मृतदेह शिवकुमारचा असल्याचे निष्पन्न झाले. चंदननगर पोलिसांनी मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी ससून रुग्णालयात पाठविला आहे.

शिवकुमारच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी पोलिसांच्या तपासाबाबत प्रश्न उपस्थित केले. मुलगा बेपत्ता झाल्यानंतर त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अपेक्षित पद्धतीने तपास केला नसल्याचा आरोप त्यांनी केला. शिवकुमारला नेमके कोणी आणि कोणत्या कारणातून पळवून नेले, त्यानंतर त्याचा मृत्यू कसा झाला, (Pune Missing Minor Death) याचा तपास करून संबंधित आरोपीला अटक करावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. आरोपीला अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात योग्य पद्धतीने तपास सुरू असल्याचे स्पष्ट केले. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यास मदत होईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. बंडगार्डन पोलिस पुढील तपास करत आहेत.

संबंधित प्रकरणाचा योग्य पद्धतीने तपास सुरू आहे. शवविच्छेदन अहवालानंतर पुढील दिशा स्पष्ट होईल. नातेवाईकांच्या आरोपांची दखल घेऊन त्या दिशेनेही तपास केला जात आहे. (Pune Missing Minor Death)

– राजलक्ष्मी शिवणकर, पोलीस उपायुक्त, परिमंडळ ५

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×