Breking News
MLC Election 2026 : विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदानBaramati Wastewater Reuse : बारामतीत सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापरPune News : पुण्यात २२ ऑक्टोबरला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’चे जनजागृती सत्रPune Assault Cases : महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; कोरेगाव पार्कमधील घटनाPune Post Office : टपाल विभागाच्यावतीने २७ ऑक्टोबरला पेन्शन अदालतीचे आयोजनYerawada Drainage Pit Death Case : येरवड्यात खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यूPune Fodder Production Plan : पुणे जिल्ह्यात २५ हजार एकरांवर चारा उत्पादनाचे नियोजनPune Police : पुण्यातील १० गुन्हेगारांना तडीपारीचा दणकाPune Water Scarcity Action Plan : संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी त्रैमासिक कृती आराखडा तातडीने सादर करा – अमित पाथरवटPune Cyber Crime : पेन्शनकार्ड नोंदणीची बतावणी, जेष्ठाला ५ लाखांचा गंडा

Pune Mobile Theft Gang : पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत भाविकांचे मोबाइल चोरणारी टोळी गजाआड

Pune Mobile Theft Gang

मालेगावमधील चोरट्यांकडून ६३ मोबाइल, मोटार जप्त

marathinews24.com

पुणे – गणेश विसर्जन मिरवणुकीत भाविकांकडील मोबाइल संच चोरणाऱ्या टोळीला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून ६३ मोबाइल, मोटार असा ३० लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. Pune Mobile Theft Gang  अटक करण्यात आलेले ११ आरोपी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव परिसरातील आहेत.

अंबाजोगाईत घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश – सविस्तर बातमी 

अब्दुल कादीर नूर मोहम्मद (वय २८), अब्दुल मलीक अब्दुल खालीक (वय २२), जियाउल रहेमान शौकत हुसेन (वय २६), मोहम्मद अस्वद मोहम्मद अजमल (वय ३१), फैसल अजीज खान (वय २४), हुजेफा अंजूम मोहम्मद साजीद (वय ३०), जुबेर अहमद मुख्तार अहमद (वय ३५), अजहर अहमद अल्ताफ अममद मोमीन (वय ३०), नावेद अख्तर शफीक अहमद अन्सारी (वय ३३), अतहर अहमद एजाज अहमद (वय २३, सर्व रा. मालेगाव, जि. नाशिक), अतुल मारोती इंगळे (वय २४, रा. गिरोली, जि. वाशीम) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

विसर्जन मिरवणुकीत भाविकांची लक्ष्मी रस्ता, जंगली महाराज रस्ता, डेक्कन जिमखाना परिसरात गर्दी झाली होती. विसर्जन मिरवणुकीत भाविकांचे मोबाइल संच चोरणारी चोरट्यांची टोळी नदीपात्र परिसरात लूटमार (Pune Mobile Theft Gang)  करण्याच्या तयारीत असल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील उपनिरीक्षक अरविंद शिंदे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावला. पोलिसांनी चोरट्यांना ताब्यात घेतले.

चौकशीत चोरट्यांनी विसर्जन मिरवणुकीतील गर्दीत भाविकांकडील मोबाइल चोरल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्यांच्याकडून ६३ मोबाइल आणि मोटार जप्त केले. चोरटे विसर्जन मिरवणुकीत मोबाइल चोरी करण्यासाठी खास मोटारीने मालेगावातून पुण्यात आले होते. विसर्जन मिरवणुकीत भाविकांचे मोबाइल चोरण्यासाठी (Pune Mobile Theft Gang)  चोरटे मोटारीने पुण्यात आले होते, अशी माहिती तपासात मिळाली. पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले, सहायक आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक अमर काळंगे, उपनिरीक्षक अरविंद शिंदे, मनीषा वलसे, सहायक फौजदार प्रदीप खळदकर, गणेश चोबे, तेजस चोपडे, गणेश जाधवर, बिडे, वालकोळी, सावके, वाघ, बेडवाल, भोसले, येसनपुरे यांनी ही कामगिरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×