पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पायी पेट्रोलिंग
marathinews24.com
पुणे – गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी शहराच्या मध्यवर्ती भागातून बेलबाग चौक ते टिळक चौक दरम्यान रूट मार्च (Pune Police Route March) केला. कायदा सुव्यवस्था आणि गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी आवश्यक तयारीचा आढावा पायी पेट्रोलिंग करून घेण्यात आला. विसर्जनाच्या पूर्वसंध्येला सायंकाळी साडेचार ते साडेपाच या वेळेत हा रूट मार्च काढण्यात आला.
पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक – सविस्तर बातमी
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी विसर्जन मिरवणुकीच्या बंदोबस्ताबाबत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. गणेशोत्सव निर्विघ्न आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा, यासाठी पुणे पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. मिरवणुकी दरम्यान कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासह गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन आणि अनुचित प्रकार रोखण्यासाठी विविध पथकांची नियुक्ती केली आहे. रूट मार्चमध्ये पोलिस आयुक्त अमितेश कुमार, (Pune Police Route March) सह पोलिस आयुक्त संजय दराडे, अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, राजेश बनसोडे यांच्यासह पोलिस उपायुक्त, पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, पोलिस अंमलदार तसेच विविध पथकांतील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
Pune Police Route March विसर्जन मिरवणुकीच्या मार्गाची पाहणी करत पोलिसांनी बंदोबस्ताच्या तयारीचा प्रत्यक्ष आढावा घेतला. संवेदनशील ठिकाणे, गर्दीची ठिकाणे तसेच वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या भागांमध्ये पोलिसांची उपस्थिती वाढविण्यात आली आहे. मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी नागरिक आणि गणेश मंडळांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.




















