अल्पवयीन आरोपींना गाडीच्या बोनेटवर बसवून काढलेली धिंड भोवली
marathinews24.com
पुणे – शहरातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याची पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी गंभीर दखल घेतली आहे. ४ पोलीस अधिकारी आणि ११ पोलीस कर्मचारी अशा १५ पोलिसांची तत्काळ बदली (Pune Police Transfer) करण्यात आली आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील पोलिसांनी अल्पवयीन मुलांना कारच्या बोनोटला बांधून त्यांची धिंड काढली होती तर दुसऱ्या एका प्रकरणात आरोपींना बेकायदेशीर डांबून त्यांना मारहाण केल्याबद्दल राज्य मानवाधिकार आयोगाने कारवाईचा बडगा उगारला होता.
राज्य मानवाधिकार आयोगाने पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह १३ पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला होता. मात्र अमितेश कुमार आणि पोलीस आयुक्तांनी या आदेशला न्यायालयात आव्हान देऊन स्थगिती मिळवली. मात्र त्यांच्या हाताखाली भारती विद्यापीठ ठाण्यात काम करणाऱ्या ११ पोलीसांवर सीआयडीने गुन्हा दाखल केला. (Pune Police Transfer) सीआयडीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली असतानाच पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हा दाखल असलेले ११ पोलीस आणि चार अधिकाऱ्यांची बदली केली आहे. कारवाईत केलेल्या अधिकाऱ्यांची विशेष शाखेत, तर पोलीस अंमलदारांची पोलीस मुख्यालयात बदली केली आहे.
बदली करण्यात आलेले पोलीस अधिकारी- अंमलदार
स्नेहल संभाजी थोरात (सहायक पोलीस निरीक्षक), नीलेश राजेंद्र मोकाशी (पोलीस उपनिरीक्षक), अण्णा मधुकर दराडे (पोलीस उपनिरीक्षक) सद्दाम हुसेन दस्तगीर फकीर (पोलीस उपनिरीक्षक) या अधिकाऱ्यांची विशेष शाखा येथे बदली केली आहे. तर सुनिल दादा हनवते (पोलीस हवालदार), दिनेश विनायक तापके (पोलीस हवालदार), मितेश दत्तात्रय चोरमले (पोलीस अंमलदार), सागर चंद्रकांत बोरगे (पोलीस अंमलदार), सोहम कैलास शेंडकर (पोलीस अंमलदार), मंगेश जयसिंग पवार (पोलीस अंमलदार), राहुल अशोक औंधकर (पोलीस अंमलदार), रवींद्र शंकर गायकवाड (पोलीस अंमलदार), संदिप लक्ष्मण आगळे (पोलीस अंमलदार), तुकाराम पंडित सुतार (पोलीस अंमलदार) सुवर्णा दत्तात्रय भिसे (पोलीस अंमलदार) यांची मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.




















