Breking News
Pune Crime Branch News : दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणारा सराईत गजाआडAmit Shah Pune Visit Traffic Changes : गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर; वाहतूकीत बदलKothrud Newborn Babies Celebration : कोथरुडमधील १ हजारहून अधिक नवजात बालकांचा अनोखा बालदिन सोहळBharat Sasane Pune : मुलांच्या कल्पनाशक्तीला पंख निर्माण करणे महत्त्वाचे-भारत सासणेVishranti Hospital Pune : विश्रांती हॉस्पिटल हे कर्करोग रुग्णांसाठी आशेचा किरण – अ‍ॅडमिरल मनीष होनवाडPune Crime News : पीएमपी प्रवासी महिलेचे दागिने लांबविलेKondhwa Flat Theft Pune : कोंढव्यात ८ फ्लॅटचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्नPune Khadak Police Theft Case : २५ दिवसांत १० हजार किलोमीटरचा प्रवास करून उघडकीस आणला गुन्हाRaghoji Bhangare Freedom Fighter : सह्याद्रीच्या कपारीत गर्जना करणारा आदिवासींचा वाघ: राघोजी भांगरेSugarcane Trash Management : ढेकळवाडी येथे ऊस पाचट व्यवस्थापन कार्यक्रम संपन्न

Pune Post Office : टपाल विभागाच्यावतीने २७ ऑक्टोबरला पेन्शन अदालतीचे आयोजन

Pune Post Office

२२ ऑक्टोबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

marathinews24.com

पुणे – Pune Post Office : टपाल विभागातील निवृत्तिवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तिवेतनधारकांच्या निवृत्तिवेतनविषयक तक्रारींचे निवारण करण्यासाठी पुणे विभागाच्या टपाल कार्यालय अधीक्षक कार्यालयामार्फत मंगळवार, दि. २७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यात २५ हजार एकरांवर चारा उत्पादनाचे नियोजन – सविस्तर बातमी 

ही सभा शिवाजीनगर, पुणे येथील पुणे विभागाच्या टपाल कार्यालय अधीक्षक कार्यालयात होणार आहे.टपाल विभागातून निवृत्त झालेल्या किंवा सेवेत असताना निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तिवेतनविषयक लाभांशी संबंधित, Pune Post Office तसेच पुणे टपाल विभागातील निवृत्तिवेतनधारकांच्या ज्या तक्रारी तीन महिन्यांच्या कालावधीत निकाली निघालेल्या नाहीत, अशा तक्रारींचाच यावेळी विचार करण्यात येणार आहे. या संदर्भातील तक्रारी २२ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी सादर करणे आवश्यक आहे.

निवृत्तिवेतनधारकांनी आपली तक्रार विहित नमुन्यात दोन प्रतींमध्ये वैयक्तिकरीत्या सादर करावी. तक्रार इतरांच्या वतीने किंवा सामूहिक स्वरूपात सादर करू नये. तक्रारीचा विहित नमुना पुणे विभागाच्या टपाल कार्यालय अधीक्षक कार्यालयातील विभागीय लेखापाल किंवा लघुलेखक यांच्याकडे उपलब्ध आहे. तसेच dopunemuffasil.mh@indiapost.gov.in या ई-मेल पत्त्यावरही तक्रार पाठविता येईल.

वारसाहक्कासह इतर निव्वळ कायदेशीर बाबी, वेतनवाढीशी संबंधित प्रकरणे, धोरणात्मक बाबींशी संबंधित शिस्तभंगाची प्रकरणे तसेच विभागीय पदोन्नती समितीच्या (डीपीसी) निर्णयाच्या पुनर्विलोकनासाठी प्रलंबित असलेली प्रकरणे या सभेत विचारार्थ घेतली जाणार नाहीत, असे टपाल विभागाने कळविले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×