Breking News
Pune Crime News : पुण्यात वेगवेगळ्या भागात दोघांना लुटलेतडीपार केलेल्या तीन महिला ताब्यात; तडीपार आदेशाचा भंग केल्याचे उघडWomen Scientists Felicitation Pune : श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे महिला शास्त्रज्ञांचा सन्मानMaharashtra Drought Relief Measures 2026 : बंद पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा; टँकरचा पर्याय शेवटी वापरा–महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेAnubandh Support Group Pune : एकटेपणावर मात करण्यासाठी अनुबंधसारखे आधारगट हवे- विजया रहाटकरDagdusheth Ganpati Trust : ‘दगडूशेठ’ गणपती ट्र्स्ट तर्फे ५०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्रPolice Constable Suspension : इन्स्टाग्रामवरील बातमीवर आक्षेपार्ह टिप्पणी भोवलीPune Crime News : तडीपारीचा आदेश धुडकावून आरोपी महिला शहरात आल्याPune Mobile Theft Case : मोबाईल चोरणारा २४ तासांत जेरबंद; लक्ष्मीनगर पोलिसांची कारवाईMaharashtra Education News : दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नका; घेतले असल्यास परत करा

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत आधार प्रमाणीकरणासाठी ३ लाख ५५ हजार ६१४ पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर

 जिल्ह्यात 50 हजार 448 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण

marathinews24.com

पुणे – ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’ अंतर्गत पुणे जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अंतिम टप्प्यात असून, आतापर्यंत 64 हजार 655 लाभार्थ्यांपैकी 50 हजार 448 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. 14 हजार 207 लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप प्रलंबित असून संबंधितांनी ते तातडीने पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन – सविस्तर बातमी

जिल्ह्यातील तालुकानिहाय प्रगतीनुसार हवेली तालुक्यात 1,351 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले असून 1,002 प्रकरणे प्रलंबित आहेत. भोर तालुक्यात 2,308 पूर्ण व 1,515 प्रलंबित, मुळशी तालुक्यात 573 पूर्ण व 142 प्रलंबित, मावळ तालुक्यात 1,352 पूर्ण व 985 प्रलंबित, खेड तालुक्यात 2,208 पूर्ण व 1,094 प्रलंबित, शिरूर तालुक्यात 4,729 पूर्ण व 730 प्रलंबित, आंबेगाव तालुक्यात 1,351 पूर्ण व 227 प्रलंबित, इंदापूर तालुक्यात 9,231 पूर्ण व 1,831 प्रलंबित, वेल्हा तालुक्यात 429 पूर्ण व 405 प्रलंबित, जुन्नर तालुक्यात 2,155 पूर्ण व 825 प्रलंबित, बारामती तालुक्यात 8, 578 पूर्ण व 939 प्रलंबित, पुरंदर तालुक्यात 3,143 पूर्ण व 782 प्रलंबित आणि दौंड तालुक्यात 10, 653 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले असून 1,883 प्रकरणे प्रलंबित आहेत.

राष्ट्रीयकृत व इतर बॅंका मध्ये 2,397 पूर्ण तर 1,847 प्रलंबित आहेत.

आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतरच पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण अद्याप झालेले नाही, त्यांनी संबंधित बँक, सेवा केंद्र किंवा कृषी विभागाशी संपर्क साधून त्वरित आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×