Breking News
केसांचा टोप लाउन घरफोड्या, सराईत टोळीचा पर्दाफाशविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ९३ टक्के अर्जांचे डिजिटायझेशन पूर्णपोलीस असल्याची बतावणी, जेष्ठेचे २ लाखांचे दागिने चोरलेआंबेडकराईट स्टुडंट असोसिएशनची समाजकल्याण आयुक्तांसोबत चर्चापुण्यात तिरंगा रॅली निमित्त वाहतुकीत बदलतंत्रज्ञानाच्या माध्यमातून २४x७ जनतेशी जोडले जाणे ही काळाची गरज – मुरलीधर मोहोळवकील महिलेची ७० लाखांची फसवणूककंपनीच्या नावे बनावट ‘ग्रुप’ करुन ४० लाखांची फसवणूकहडपसरमध्ये मोटारीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठाचा मृत्यूरविवार पेठेत खरेदी करणाऱ्या महिलेचे दागिने चोरीला

राजा पंढरीचा’ भक्तिमय संगीत मैफलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राजा पंढरीचा' भक्तिमय संगीत मैफलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

विठ्ठल नामाच्या गजरात रंगली सुरेल संध्या; भक्तिगीतांनी भारावले पुणेकर

marathinews24.com

पुणे – सर्वोत्कर्ष पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने आयोजित ‘राजा पंढरीचा’ हा भक्तिमय संगीत कार्यक्रम अण्णाभाऊ साठे नाट्यगृह, पद्मावती येथे उत्साहात संपन्न झाला. विठ्ठल भक्तीचा गजर, सुरेल सादरीकरण आणि भक्तिरसाने नटलेल्या वातावरणामुळे कार्यक्रमाला उपस्थित रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

माऊली’ नाट्यप्रयोगातून संत ज्ञानेश्वरांच्या जीवनचरित्राचा भावस्पर्शी आविष्कार – सविस्तर बातमी 

कार्यक्रमात गायक राजेश दातार, सावनी दातार कुलकर्णी आणि स्वरदा गोडबोले यांनी आपल्या सुरेल आवाजात ‘ये गं ये गं विठाबाई’, ‘माझे माहेर पंढरी’, ‘कानडा राजा पंढरीचा’, ‘विठू माऊली तू’, ‘गगनसदन तेजोमय तिमिर’, ‘मोगरा फुलला’, ‘कानडा विठ्ठलू कर्नाटकू’ आणि ‘पांडूरंग श्रीरंग’ ही लोकप्रिय भक्तिगीते सादर केली. प्रत्येक गीताला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद देत कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढवली.

प्रख्यात बासरीवादक अमर ओक यांच्या सुरेल बासरीवादनाने कार्यक्रमाला वेगळीच उंची मिळाली. तर मिलिंद कुलकर्णी यांच्या प्रभावी निरूपणामुळे प्रत्येक गीताचा भावार्थ आणि भक्तीमय वातावरण अधिक खुलून आले.

या कार्यक्रमात विनीत तिकोणकार (तबला), आनंद टाकळकर (टाळ), तुषार केळकर (हार्मोनियम) आणि अमृता ठाकुरदेसाई (की-बोर्ड) यांनी आपल्या उत्कृष्ट वादनातून मोलाची साथ देत संपूर्ण मैफलीची रंगत अधिक खुलवली.

भक्ती, अध्यात्म आणि संगीताचा सुंदर मिलाफ अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या रसिकांनी संपूर्ण कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×