Breking News
Chakan Industrial Area Development : प्रशासन आणि उद्योजकांच्या समन्वयातून चाकण औद्योगिक क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधावाSrinagar Dussehra Celebration : श्रीनगरमध्ये दसऱ्याचा उत्साह; सामाजिक सलोख्याचे दर्शनPune Teacher Constituency Election : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदानRana Suryawanshi Attack Case : दोन लाखांची सुपारी, हल्लेखोरासह दोघे अटकेतPune Drunk Driving Accident : मद्यपी टेम्पो चालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यूWagholi Newborn Baby Case : वाघोलीत ५ दिवसांच्या नवजात बालिकेला कचऱ्यात फेकलेPune News : पुण्यात ९ जणांची न्यायालयाकडून दोषमुक्‍ती !Spa Center Raid Pune : स्पा सेंटरच्या आड वेश्या व्यवसाय; कोंढव्यात पोलिसांचा छापाDr. Neelam Gorhe : दुष्काळाचे संकट टळावे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्या-डॉ. नीलम गोऱ्हेPune Drought News : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ८ तालुक्यांतील ८५ टक्के पिकांचे पंचनामे पूर्ण

Rana Suryawanshi Attack Case : दोन लाखांची सुपारी, हल्लेखोरासह दोघे अटकेत

Rana Suryawanshi Attack Case

अल्पवयीन ताब्यात, उद्योजक राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरण

marathinews24.com

पुणे – Rana Suryawanshi Attack Case : उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला करण्यासाठी अल्पवयीनासह दोघांना २ लाखांची सुपारी दिल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी अल्पवयीनाला ताब्यात घेतले असून, त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. दरम्यान, हल्ला करण्यासाठी एका वाहन चालकाने सुपारी दिली असून, त्याच्या मागे आणखी कोणाचा हात आहे, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

मद्यपी टेम्पो चालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू – सविस्तर बातमी 

पार्थ वासुदेव अवस्थळे (वय १९ रा. पिंपरी गवरी, खामगाव, बुलढाणा, सध्या- कर्वेनगर, पुणे) आणि ज्ञानदेव महादेव शिंदे (वय ५०, रा. वीट, करमाळा, सोलापूर, सध्या-थोरातनगर, भिगवण) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने दोघांनाही २३ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. राणा दिलीप सूर्यवंशी (वय ४१ रा. मगरपट्टा, हडपसर) असे गंभीर जखमी झालेल्या उद्योगपतीचे नाव आहे. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी लक्ष्मीकांत महादेव सूर्यवंशी यांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राणा सूर्यवंशी हे उद्योजक असून, कामानिमित्त ते १८ ऑक्टोबरला रात्री सव्वा सातच्या सुमारास बारामतीमधील पालखी मार्गावर दोघांसोबत बोलत थांबले होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या आरोपींनी राणा यांना आपण तुमचे फॅन असून, फोटो काढायचा असल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांनी सोबत फुलांचा मोठा गुच्छ आणला होता. आरोपींना फोटो काढताना स्वतःच्या तोंडावर मास्क लावला होता. राणा यांच्या सोबत असलेल्या मित्राने आरोपीला मास्क का काढला नाही, असे विचारताच त्याने सत्तूर बाहेर काढला. राणा यांच्या हातावर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झटापट झाल्यानंतर आरोपी दुचाकीवरुन पसार झाले. दरम्यान, हल्ल्यानंतर राणा यांना तत्काळ बारामतीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

बारामती तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेजसह गोपनीय माहितीच्या आधारे अल्पवयीनासह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत आरोपी पार्थ अवस्थळे याने हल्ल्याची सुपारी ज्ञानदेव शिंदे याने दिल्याचे सांगितले. त्यासाठी २ लाख रुपयेही दिल्याचीही माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी ज्ञानदेव शिंदे याला ताब्यात घेत अटक केले. दरम्यान, सुपारी देणारा शिंदे हा वाहन चालक असून, तो व्यवस्थानाचे काम करीत असल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, त्याला हा हल्ला घडवून आणणे, सुपारी देण्यासाठी हल्लेखोरांची निवड करणे ही जबाबदारी कोणी दिली, हल्ला कोणत्या कारणासाठी केला, सुपारी देणारा शिंदे आणि उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यात काय वाद आहेत, यामागे आणखी कोणी दुसरा बडा व्यक्ती आहे का, यादृष्टीने पोलीस तपास करीत आहेत. उद्योजकावर हल्ला करणार्‍या अल्पवयीनाला ताब्यात घेतले असून, एकाला अटक केली आहे. दरम्यान, यातील आरोपी ज्ञानदेव शिंदे याने हल्लेखोरांना पैसे का दिले, यादृष्टीने तपास सुरू आहे.

नारायण पवार, पोलीस निरीक्षक, बारामती तालुका पोलीस ठाणे

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×