३० पोलीस अधिकार्यांच्या बदल्या
marathinews24.com
पुणे – जिल्ह्यातील ग्रामीण पोलीस दलात मोठा फेरबदल करण्यात आला असून, तब्बल ३० पोलीस अधिकार्यांच्या बदली करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी बदलीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, आगामी वारी सोहळा, गणपतीउत्सवासह कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने नवनियुक्त अधिकार्यांना आपली जबाबदारी सचोटीने पार पाडावी लागणार आहे.
बदली झालेले पोलीस अधिकारी (कंसात कोठून कोठे)
पोलीस निरीक्षक दत्तात्रय किसन गुंड (नियंत्रण कक्ष ते जुन्नर पोलीस ठाणे ), कुमार रामचंद्र कदम (सासवड ते रांजणगाव एमआयडीसी), चंद्रशेखर मोहनराव यादव (बारामती तालुका ते शिक्रापूर), विनोद भगवान पाटील (नियंत्रण कक्ष ते शिरूर), सचिन दिनकर पाटील (विशेष शाखा ते लोणावळा शहर), राजेश नारायणराव रामघरे (लोणावळा शहर ते हवेली), संतोष वसंत तासगावकर (आर्थिंक गुन्हे शाखा ते यवत), हेमंत गणपत झेंडे (नियंत्रण कक्ष ते दौंड), विजयस्माला महादेव पवार (जिल्हा विशेष शाखा ते उरुळी कांचन), संतोष शामराव जाधव (जिल्हा वाहतूक शाखा ते राजगड), महादेव नारायण वाघमोडे (रांजणगाव एमआयडीसी ते आर्थिक गुन्हे शाखा), संदेश अरुण केंजळे (शिरूर आर्थिक गुन्हे शाखा), वैशाली रावसाहेब पाटील (हवेली ते महिला कक्ष/भरोसा सेल) नारायण शिवाजी देशमुख (यवत ते एफआरओ),
राजेश गणेश गवळी (राजगड ते अतिरिक्त मानवी वाहतूक प्रतिबंधक विभाग) निलेश पांडुरंग माने (वाहतूक शाखा बारामती ते भोर), संतोष श्रीमंत घोलपे (टीएमसी पुणे ग्रामीण ते सासवड), रविंद्र दत्तात्रय पाटील (एफआरओ ते जेजुरी), नारायण शिवाजी देशमुख (यवत ते एफआरओ) पोलीस निरीक्षक गोपाळ वासू पवार (दौंड ते जिल्हा वाहतूक शाखा), महेश रामेश्वर स्वामी (नियंत्रण कक्ष ते वाहतूक शाखा बारामती विभाग) दिपरतन गोरख गायकवाड (शिक्रापूर ते जिल्हा विशेष शाखा) यांची बदली करण्यात आली आहे. बदल्यांमुळे पुणे ग्रामीण पोलीस दलातील विविध पोलीस ठाणे, शाखा आणि विशेष पथकांमध्ये नव्या अधिकार्यांकडून कामाला गती मिळणार आहे.
प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक खालीलप्रमाणे
सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील (वडगाव निंबाळकर ते नियंत्रण कक्ष), सोमनाथ पांडुरंग शेंडगे (नियंत्रण कक्ष ते भिगवण), कुलदीप दत्तात्रय सुतारपळकर (स्थानिक गुन्हे शाखा ते माळेगाव), महेश नामदेव मेश्रराम (सुरक्षा शाखा ते सायबर पोलीस ठाणे)





















