Breking News
भटके विमुक्त समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; कारवाईची मागणीउपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोरपणे व्यवस्थापन करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांचे निर्देशविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम सर्व विभागांनी समन्वयाने यशस्वी करावामहाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभागातर्फे २२ जूनपासून राज्यभर ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रा’चे आयोजन – शेखर मुंदडाबीडमध्ये एफडीएची मोठी कारवाई; केजमध्ये विशाल डेअरीवर धाडरिक्षा चालकाला मारहाण करून लुटणाऱ्या टोळीला अटकदुचाकी मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक राखून ठेवण्याबाबत अर्ज स्वीकारण्यास सुरुवात‘दगडूशेठ’ गणपती यंदा गणेशोत्सवात वृंदावनमधील प्रेम मंदिरात होणार विराजमाननशामुक्त भारत अभियानाचा सामाजिक न्याय भवन येथे शुभारंभआंतरजिल्हा दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश, २० गुन्हे उघडकीस

शेअरमध्ये गुंतवणूकीच्या आमिषाने २५ लाखांचा गंडा

शेअर मार्केटमधील गुंतवणूक पडली ३२ लाखांना

नर्‍हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी महिलेला तब्बल २५ लाखांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना ९ जानेवारी ते १० मे २०२४ कालावधीत नर्‍हे परिसरात घडली आहे. याप्रकरणी ३२ वर्षीय महिलेने नर्‍हे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक, लिंकधारकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आंतरराज्यीय तस्करांकडून २ कोटी ३९ लाखांचा गांजा जप्त – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला नर्‍हे परिसरात राहायला असून, ९ जानेवारी २०२४ रोजी सायबर चोरट्यांनी त्यांना संपर्क साधला. शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर अवघ्या पाच महिन्यात सायबर चोरट्यांनी महिलेकडून तब्बल २५ लाख रूपये उकळून फसवणूक केली. त्यांना परतावा न देता आर्थिंक गंडा घातला आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम शेटे तपास करीत आहेत.

नोकरीच्या आमिषाने २२ लाखांची फसवणूक

नोकरी देण्याची बतावणी करीत सायबर चोरट्याने ४७ वर्षीय नागरिकाची तब्बल २२ लाख ७ हजारांची फसवणूक केली आहे. ही घटना १ ऑगस्ट २०२५ ते १८ मे २०२६ कालावधीत खराडीत घडली आहे. याप्रकरणी संबंधिताने खराडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सायबर चोरट्याने तक्रारदाराला नागपूरातून बोलत असल्याची बतावणी करीत नोकरी देण्याचे सांगितले. त्यांचा विश्वास संपादित करून २२ लाख रूपये पाठवण्यास भाग पाडले. याप्रकरणी पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×