Breking News
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हाकस्टमने पकडल्याचे सांगून तरुणीची २२ लाखांची फसवणूक

स्वयंसेवी संस्थेतील लिपिकाकडून शिष्यवृत्तीचा अपहार

लक्ष्मी रस्त्यावर महिलेच्या पिशवीतून दागिने चोरीला

५५ लाखांचा अपहार प्रकरणी गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – महिला सक्षमीकरण, तसेच विकासासाठी काम करणाऱ्या शहरातील एका नामवंत स्वयंसेवी संस्थेतील लिपिकाने विद्यार्थिनींना दिल्या जाणऱ्या शिष्यवृत्तीचा अपहार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी लिपिकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. स्वयंसेवी संस्थेच्या संचालक अपर्णा गिरीश केळकर (वय ७२, रा. माॅडेल काॅलनी, शिवाजीनगर) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अक्षय विजय कुलकर्णी (रा. प्राधिकरण, निगडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तब्बल २ हजार ४०० किलो गांजा नष्ट – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वाधार ही संस्था महिला सक्षमीकरण आणि बालविकास क्षेत्रात काम करते. या संस्थेकडून गुणवंत विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देण्यात येते. कुलकर्णी याच्याकडे बँक व्यवहार, तसेच हिशेबाची जबाबदारी होती. शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थिनींच्या खात्यात जमा केली जाते. ऑनलाइन पद्धतीने बँकेकडून ही रक्कम जमा करण्यात येते. आरोपीने बँकेकडे विद्यार्थिनीची यादी बँकेकडे सादर केली. या यादीत त्याने फेरफार केला. ही रक्कम त्यांनी स्वत:च्या खात्यात जमा करुन घेतली.

२४ जून २०२१ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालवाधीत कुलकर्णी याने यादीत फेरफार करुन ५४ लाख ९८ हजार रुपयांचा अपहार केला. लेखापरीक्षणात हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×