Breking News
MLC Election 2026 : विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदानBaramati Wastewater Reuse : बारामतीत सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापरPune News : पुण्यात २२ ऑक्टोबरला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’चे जनजागृती सत्रPune Assault Cases : महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; कोरेगाव पार्कमधील घटनाPune Post Office : टपाल विभागाच्यावतीने २७ ऑक्टोबरला पेन्शन अदालतीचे आयोजनYerawada Drainage Pit Death Case : येरवड्यात खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यूPune Fodder Production Plan : पुणे जिल्ह्यात २५ हजार एकरांवर चारा उत्पादनाचे नियोजनPune Police : पुण्यातील १० गुन्हेगारांना तडीपारीचा दणकाPune Water Scarcity Action Plan : संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी त्रैमासिक कृती आराखडा तातडीने सादर करा – अमित पाथरवटPune Cyber Crime : पेन्शनकार्ड नोंदणीची बतावणी, जेष्ठाला ५ लाखांचा गंडा

शालेय विद्यार्थी वाहतुकीत सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे

शालेय विद्यार्थी वाहतुकीत सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम

marathinews24.com

बारामती – शालेय विद्यार्थी वाहतुकीत सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे – शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक हा अत्यंत संवेदनशील विषय असून त्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, वाहतूक सुरक्षाविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करुन त्यांची सुरक्षितरित्या वाहतूक करावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी केले.

ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीच्या ढोले पाटील स्कूल फॉर एक्सलन्स येथे पदवीदान समारंभ – सविस्तर बातमी 

बारामती, दौंड आणि इंदापूर तालुक्यातील शालेय विद्यार्थी वाहतूक संघटनाना विद्यार्थी वाहतूक सुरक्षितता नियमांबाबत माहिती होण्यासोबतच या नियमांचे पालन व्हावे याकरिता उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे रविवारी (३ ऑगस्ट) आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी सुमारे १०० हून अधिक चालक व मालक उपस्थितीत होते.

निकम म्हणाले, शालेय विद्यार्थी वाहतूक बस नियमावलीअंतर्गत शासनाने घालून दिलेल्या निर्देशाचे काटेकोरपणे पालन करावे. सुरक्षित वाहतुकीच्यादृष्टीने वाहन परवाना, विमा, वाहनाची योग्यता, प्रदूषण तपासणी प्रमाणपत्र, परवानाधारक चालक व वाहकांची संपूर्ण माहिती अद्ययावत ठेवणे अनिवार्य आहे. वाहनावर ‘स्कूलबस’ अशी ओळख पट्टी, आपत्कालीन स्थितीत बाहेर पडण्याचा मार्ग, प्रथमोपचार पेटी, अग्निशामक यंत्र आदी सुविधा बसमध्ये असणे बंधनकारक आहे.

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे सांगून ते पुढे म्हणाले, शाळेच्या परिसरात वाहन सुरक्षित चालवावे. वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळावा, विद्यार्थ्यांची बसमध्ये चढ-उतार करताना तसेच रस्ता ओलांडताना विद्यार्थ्यांचे अपघात होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. वेगमर्यादेचे पालन करुन सुरक्षितरित्या वाहन चालवावे. वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

बसचे चालक, वाहक मद्यपान करीत नसल्यासोबत ते गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नसावेत. बसमधील सर्व प्रवाशांचा विमा अद्ययावत असावा. वाहनात कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर फेरबदल करू नये. वाहतूकदारांनी विद्यार्थ्यांच्या पालकांचा विश्वास जपला पाहिजे. नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींची गांभिर्याने दखल घेऊन नियमानुसार कारवाई करण्यात येत आहे, असे आवाहन निकम यांनी केले. बैठकीत वाहनांची तपासणी करण्याच्या अनुषंगाने नियमांचे पालन करण्याबाबत माहिती देण्यात आली. तसेच वाहन मालक, चालकांच्या समस्यांबाबत माहिती घेण्यात आली.

यावेळी मोटार वाहन निरीक्षक गंगाधर मेकलवार, सहायक मोटार वाहन निरीक्षक रजत काटवटे, विद्यार्थी वाहतूक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष तानाजी बांदल, पश्चिम महाराष्ट्र विद्यार्थी वाहतूक संघटनेचे उपाध्यक्ष दीपक वाघमारे, जिल्हाध्यक्ष जाहीद बागवान, बारामती तालुकाध्यक्ष गणेश सावंत, दौंड तालुकाअध्यक्ष राजू साठे, इंदापूर तालुकाध्यक्ष विशाल कांबळे, अनिल गोलांडे, संतोष तरटे, नानासो गावडे, भूषण आगवणे आदी उपस्थित होते.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top
×