Breking News
फ्लाईंग जिप्सी कॅफेला दणका, तोपर्यंत बंद ठेवणारपुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे ‘अतिउत्कृष्ट सेवा पदक’हाफकिन संस्थेला गतवैभव मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध – राज्यमंत्री योगेश कदममहा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावेसिंहगड रस्ता भागात घरातून बेकायदा मद्य विक्री; आरोपीला अटकडाॅक्टरांकडे १० लाखांची खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकारांविरुद्ध गुन्हाजलसंधारण दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजनशीघ्र हस्तक्षेपण व शाळापूर्व तयारीसाठी क्रॉस डिसॅबिलिटी अभ्यासक्रम आराखड्याचे लोकार्पणपुणे जिल्ह्यातील जलसंधारण चळवळ : एक दृष्टीक्षेप…!!टेम्पोच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

खासगी शिकवणीत गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाची फसवणूक

खासगी शिकवणीत गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाची फसवणूक

चांगल्या परताव्याचे आश्वासन देत निवृत्त व्यक्तीला गंडा

marathinews24.com

पुणे – खासगी शिकवणीत गुंतवणुकीचे आमिष एका ज्येष्ठ नागरिकाची साडेपंधरा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी शिकवणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत ज्येष्ठ नागरिकाने फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, लातूर पॅटर्न या खासगी शिकवणी वर्गाचे चालक विष्णू धोडींराम बिराजदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पानपट्टीवर धक्का लागल्याने तरुणाचा खुनाचा प्रयत्न – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिक पिंपरी-चिंचवडमधील ताथवडे परिसरात राहायला आहेत. ते सेवानिवृत्त आहेत. बिराजदार यांची ज्येष्ठ नागरिकाशी २०२१ मध्ये ओळख झाली होती. शिकवणी वर्गात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष आरोपीने त्यांना दाखविले. त्यानंतर त्यांच्याकडून वेळोवेळी साडेपंधरा लाख रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर त्यांना परतावा दिला नाही. परताव्याबाबत विचारणा केल्यानंतर टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक भंडारे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×