Breking News
Women Scientists Felicitation Pune : श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे महिला शास्त्रज्ञांचा सन्मानMaharashtra Drought Relief Measures 2026 : बंद पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा; टँकरचा पर्याय शेवटी वापरा–महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेAnubandh Support Group Pune : एकटेपणावर मात करण्यासाठी अनुबंधसारखे आधारगट हवे- विजया रहाटकरDagdusheth Ganpati Trust : ‘दगडूशेठ’ गणपती ट्र्स्ट तर्फे ५०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्रPolice Constable Suspension : इन्स्टाग्रामवरील बातमीवर आक्षेपार्ह टिप्पणी भोवलीPune Crime News : तडीपारीचा आदेश धुडकावून आरोपी महिला शहरात आल्याPune Mobile Theft Case : मोबाईल चोरणारा २४ तासांत जेरबंद; लक्ष्मीनगर पोलिसांची कारवाईMaharashtra Education News : दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नका; घेतले असल्यास परत कराPune Fertilizer License Suspended : रब्बी हंगामात खत विक्रीतील अनियमिततेप्रकरणी जिल्ह्यात चार वितरकांचे परवाने निलंबितDharau Marathi Movie 2026 : ‘धाराऊ… ती गाय नाय… माय हाय मायेच्या अतूट नात्याची भावस्पर्शी गोष्ट २३ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहांत

ज्येष्ठ नागरिकाची ४ लाख ४३ हजार रुपयांची फसवणूक

Cyber Crime Pune : पुण्यात सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठ नागरिक ‘लक्ष्य’

‘एसआयआर फाॅर्म’मध्ये चूक झाल्याची बतावणी

marathinews24.com

पुणे – मतदार यादी दुरुस्ती अर्जात (एसआयआर फाॅर्म) चूक झाल्याची बतावणी करुन सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची ४ लाख ४३ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध अलंकार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या ‘डीपफेक व्हिडीओद्वारे फसवणुक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे कर्वेनगरमधील नवसह्याद्री सोसायटीत राहायला आहेत. ते एका खासगी कंपनीतून निवृत्त झाले आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर ३० जुलै रोजी संपर्क साधला. ‘मतदार यादी दुरुस्तीचे काम सुरू असून, तुम्ही भरलेल्या मतदार यादी दुरुस्ती अर्जात चूक झाली आहे’, असा संदेश सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर पाठविला होता. त्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर समाज माध्यमातून एक फाॅर्म पाठविला. ‘या फाॅर्मसाठी पाच रुपये भरावे लागतील’, असे सांगून चोरट्यांनी त्यांना एपीके फाईल पाठविली. एपीके फाईलमध्ये बँक खात्याची माहिती भरावी लागेल, असे त्यांना सांगण्यात आले. त्यांनी एपीके फाईलमध्ये बँक खाते क्रमांक, तसेच अन्य माहिती भरल्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांचा मोबाइल क्रमांकाचा तांत्रिक ताबा घेतला.

सायबर चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्यातून चार लाख ४३ हजार रुपये काढून घेतले. खात्यातून काढण्यात आलेली रक्कम दुसऱ्या खात्यात जमा केली. खात्यातून रक्कम काढण्यात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. या प्रकरणाचा तांत्रिक तपास करण्यात येत आहे. सायबर चोरट्यांनी ज्या खात्यात पैसे वळविले. त्या खात्याची माहिती घेण्यात येत आहे. पोलीस निरीक्षक स्मिता पाटील तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×