Breking News
केसांचा टोप लाउन घरफोड्या, सराईत टोळीचा पर्दाफाशविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ९३ टक्के अर्जांचे डिजिटायझेशन पूर्णपोलीस असल्याची बतावणी, जेष्ठेचे २ लाखांचे दागिने चोरलेआंबेडकराईट स्टुडंट असोसिएशनची समाजकल्याण आयुक्तांसोबत चर्चापुण्यात तिरंगा रॅली निमित्त वाहतुकीत बदलतंत्रज्ञानाच्या माध्यमातून २४x७ जनतेशी जोडले जाणे ही काळाची गरज – मुरलीधर मोहोळवकील महिलेची ७० लाखांची फसवणूककंपनीच्या नावे बनावट ‘ग्रुप’ करुन ४० लाखांची फसवणूकहडपसरमध्ये मोटारीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठाचा मृत्यूरविवार पेठेत खरेदी करणाऱ्या महिलेचे दागिने चोरीला

सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठाची ६२ लाखांची फसवणूक

कर्ज मंजूर करण्याच्या आमिषाने बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक

चोरट्यांविरुद्ध सायबर पोलिसांनी केला गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाची ६२ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एकाने शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सायबर चोरट्यांविरुद्ध माहिती-तंत्रज्ञान कायदा, तसेच फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला.

पुण्यात तडीपार आरोपींना अटक, पिस्तूलांसह काडतुसे जप्त – सविस्तर बातमी

पोलिसंनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण धनकवडी भागात राहायला आहे. सायबर चोरट्यांनी तक्रारदार तरुणाच्या वडिलांच्या मोबाइल क्रमांकावर शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत संदेश पाठविला होता. सायबर चोरट्यांनी त्यांना एक लिंक पाठवून शेअर बाजारातील गुंतवणूक विषक याेजनांची माहिती दिली. चोरट्यांनी त्यांना समाज माध्यमातील एका समुहात सहभागी करुन घेतले.

चोरट्यांनी त्यांना जाळ्यात ओढले. त्यानंतर चोरट्यांच्या बंँक खात्यात त्यांनी वेळोवेळी ६२ लाख ७० हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर चोरट्यंनी त्यांना परतावा दिल्याचे भासविले. प्रत्यक्षात त्यांना परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. पोलीस निरीक्षक संगीता देवकाते तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×