Breking News
ठेकेदाराच्या कुटुंबाला धाक दाखवून २७ लाखांची घरफोडीमहात्मा जोतीराव फुले द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त पशुसंवर्धन विभागाचे विविध उपक्रमपुण्यात नवले ब्रीज परिसरात वेश्या व्यवसायाचा पर्दाफाशअल्पवयीन मुलाशी अश्लील कृत्य; तिघांविरुद्ध गुन्हाकात्रजमध्ये अल्पवयीनावर शस्त्राने वार करून खून‘मिशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत बेकायदा धंद्यांवर कारवाईदिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त बारामती एमआयडीमध्ये १ हजार वृक्ष लागवडीचे नियोजन-प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटीलअंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलावविद्यार्थ्यांच्या सहभागामुळे एसआयआर मोहिमेला गतीडंपरच्या धडकेत पदाचारी ठार, पुणे महापालिकेजवळील अपघात

सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठाची फसवणूक

सायबर फसवणूक पुणे

कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – बँक खाते अद्ययावत (अपडेट) करण्याची बतावणी करुन सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची पाच लाख ९९ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हडपसरमधील उच्चभ्रु सोसायटीत भरदिवसा घरफोडी – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक जून चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. एका राष्ट्रीयकृत बँकेतून बोलत असल्याची बतावणी चोरट्यांनी केली. बँक खाते अद्ययावत न केल्यास खाते बंद पडेल, अशी बतावणी चोरट्यांनी केली. त्यानंतर बँक खाते अद्ययावत करण्याचा बतावणी करुन चोरट्यांनी बँक खात्याची माहिती घेतली. माहितीचा दुरुपयोग करुन चोरट्यांनी त्यांच्या खात्यातून पाच लाख ९९ हजार रुपये लांबविले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मंडले तपास करत आहे.

कर्जाच्या आमिषाने तरुणाची ४ लाखांची फसवणूक

कर्ज देण्याच्या आमिषाने चोरट्यांनी तरुणाची चार लाख ११ हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात माहिती-तंत्रज्ञान कायदा, तसेच फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार तरुण सिंहगड रस्त्यावरील गणेश मळा भागात राहायला आहे. तरुणाने कर्जाबाबतची जाहिरात वाचली होती. या जाहिरातीतील क्रमांकावर त्याने संपर्क साधला. कर्ज मंजूर करुन देण्यासाठी चोरट्यांनी त्याच्याकडून चार लाख ११ हजार रुपये घेतले. कर्ज मंजूर केले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×