Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

पाॅलिसीचे पैसे देण्याच्या आमिषाने ज्येष्ठाची २८ लाखांची फसवणूक

जमीन खरेदीत गुंतवणुकीच्या आमिषाने अडीच कोेटींची फसवणूक

विमा पॉलिसीची रक्कम परत मिळवून देण्याचे आमिष; ज्येष्ठाला २८.३८ लाखांचा गंडा

marathinews24.com

पुणे – आयुर्विमा पाॅलिसीचे पैसे मिळवून देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची २८ लाख ३८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सिंहगड रस्ता भागात भरदिवसा घरफोडी – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ६३ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे आंबेगाव परिसरात राहायला आहेत. त्यांनी आयुर्विमा पाॅलिसी काढली होती. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. आयुर्विमा पाॅलिसीचे पैसे परत मिळवून देतो, अशी बतावणी केली. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना पाॅलिसीची रक्कम परत मिळवण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल, असे सांगितले. विविध प्रकारचे कर भरल्यानंतर पाॅलिसीची संपूर्ण रक्कम व्याजासह मिळेल, असेही त्यांना सांगण्यात आले होते. वेगवेगळी कारणे सांगून चोरट्यांनी त्यांना पैसे भरण्यास सांगितले. चोरट्यांच्या खात्यात त्यांनी वेळोवेळी २८ लाख ३८ हजार रुपये जमा केले. पाॅलिसीचे पैसे परत मिळवून न दिल्याने त्यांनी चोरट्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. चोरट्यांचा मोबाइल क्रमांक बंद असल्याचे लक्षात आले. ज्येष्ठ नागरिकाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास कोडग तपास करत आहेत.

व्यावसायिकाची १० लाखांची फसवणूक

सायबर चोरट्यांनी एका व्यावसायिकाची दहा लाख ३८ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत एका व्यावसायिकाने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार व्यावसायिक हे सिंहगड रस्ता परिसरात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. स्वस्तात लिथियम बॅटरी देतो, असे चोरट्यांनी त्यांना सांगितले. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. चोरट्यांच्या खात्यात त्यांनी वेळोवेळी पैसे जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×