Breking News
Pune Crime News : पुण्यात वेगवेगळ्या भागात दोघांना लुटलेतडीपार केलेल्या तीन महिला ताब्यात; तडीपार आदेशाचा भंग केल्याचे उघडWomen Scientists Felicitation Pune : श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे महिला शास्त्रज्ञांचा सन्मानMaharashtra Drought Relief Measures 2026 : बंद पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा; टँकरचा पर्याय शेवटी वापरा–महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेAnubandh Support Group Pune : एकटेपणावर मात करण्यासाठी अनुबंधसारखे आधारगट हवे- विजया रहाटकरDagdusheth Ganpati Trust : ‘दगडूशेठ’ गणपती ट्र्स्ट तर्फे ५०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्रPolice Constable Suspension : इन्स्टाग्रामवरील बातमीवर आक्षेपार्ह टिप्पणी भोवलीPune Crime News : तडीपारीचा आदेश धुडकावून आरोपी महिला शहरात आल्याPune Mobile Theft Case : मोबाईल चोरणारा २४ तासांत जेरबंद; लक्ष्मीनगर पोलिसांची कारवाईMaharashtra Education News : दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नका; घेतले असल्यास परत करा

लोणी काळभोरमध्ये मोटारीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यू

डंपरच्या धडकेत पदाचारी ठार, पुणे महापालिकेजवळील अपघात

चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – भरधाव मोटारीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावर लोणी काळभोर भागात घडली. याप्रकरणी मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुपाराम रामाजी बावरी (वय ७०, रा. थेऊर फाटा, कुंजीरवाडी, पुणे-सोलापूर रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठाचे नाव आहे.

पुण्यातून तडीपार केलेल्या तीन गुंडाना पकडले – सविस्तर बातमी

याप्रकरणी मोटार चालक ऋतिक दत्तात्रय सोनवणे (रा. मांगडेवाडी, कात्रज) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत भुरी रमेश भाटी (वय २६, रा. थेऊर फाटा, कुंजीरवाडी, पुणे-सोलापूर रस्ता) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बावरी हे भाटी यांचे वडील आहेत. गेल्या महिन्यात १७ जुलै रोजी सकाळी अकराच्या सुमारास बावरी हे पुणे-सोलापूर रस्त्यावरील कुंजीरवाडी परिसरातून निघाले होते. त्या वेळी भरधाव मोटारीने रस्ता ओलांडणाऱ्या बावरी यांना धडक दिली होती. गंभीर जखमी झालेल्या बावरी यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर त्यांची मुलगी भुरी भाटी यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक अरुण जाधव तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×