Breking News
पुणे महापालिकेच्या सर्व्हर रूममधून कॉम्प्युटरची हार्ड डिस्क चोरीलापर्वती परिसरात सिक्युरटेक कंपनीची १९ लाखांची फसवणूकगाडी चालकावरून झाला वाद; डोक्यात घातला दगडदारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावापुण्यात समरसता लोककला संमेलनाचे २८ जूनला आयोजन

पीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीला

पीएमपीएल बसचालकाचा बेदरकारपणा दोघांच्या जीवावर

अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – पीएमपीएल बसप्रवासात गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी जेष्ठ महिलेच्या हातातील ६० हजारांची सोन्याची बांगडी चोरून नेली. ही घटना १ जूनला दुपारी सव्वा एकच्या सुमारास अहिल्यादेवी चौक ते धनकवडी प्रवासादरम्यान घडली आहे. याप्रकरणी डेक्कन जिमखाना परिसरात राहणार्‍या ६० वर्षीय महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्या – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला डेक्कन परिसरात राहायला असून, १ जूनला दुपारी एकच्या सुमारास त्या महानगरपालिका जवळील अहिल्यादेवी चौक ते धनकवडी असा पीएमपीएल बसप्रवास करीत होत्या. त्यावेळी गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या हातातील ६० हजार रूपयांची सोन्याची बांगडी कापून चोरून नेली. बसमधून उतरल्यानंतर महिलेला हातात सोन्याची बांगडी नसल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस अमलदार शिवतरे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×