Breking News
MPSC Protest Pune : ‘पुणे बंद करण्याची भूमिका घेत असाल तर पुणेकरच उत्तर देतील’; MPSC आंदोलनावर आमदार डावखरेंचा रोहित पवारांना सल्लाMPSC Protest: एमपीएससी आंदोलनाविरोधात जनहित याचिकाFarmers, Drought : दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूरPune Crime : पुण्याच्या ग्रामदैवताची दानपेटी फोडली, आरोपीला बेड्या630 Special Teachers Felicitation : दिव्यांग विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या विशेष शिक्षकांच्या कार्याचा गौरवVasundhara Pady Dindi : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘वसुंधरा पायी दिंडी’चे प्रस्थानDr Anil Dudhabhate Medical Award : ‘दृष्टीदूत’ डॉ. अनिल दुधभाते यांना मराठवाडा युवा मंचचा वैद्यकीय पुरस्कारSeva Sankalp Abhiyan : ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत बारामतीत महिला आरोग्य, अवयवदान व रक्तदानाबाबत जनजागृतीSonali Kulkarni : चित्रपटाविषयी प्रेक्षकांनी सम्यक प्रतल शोधणे आवश्यक-सोनाली कुलकर्णीPune Crime : भरदिवसा दुचाकीच्या डिक्कीतून दागिने चोरीला

Share Market Fraud : शेअर बाजारात गुंत‌वणुकीच्या आमिषाने महिलेची ४९ लाखांची फसवणूक

Share Market Fraud : शेअर बाजारात गुंत‌वणुकीच्या आमिषाने महिलेची ४९ लाखांची फसवणूक

मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून ५६ वर्षीय महिलेची ४९ लाखांची फसवणूक

marathinews24.com

पुणे – Share Market Fraud : शेअर बाजारात गुंत‌वणुकीच्या आमिषाने एका महिलेची सायबर चोरट्यांनी ४९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका ५६ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

ऑनलाइन टास्कच्या आमिषाने महिलेची ८ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला बुधवार पेठेतील श्री जोगेश्वरी मंदिराजवळील एका सोसायटीत राहायला आहेत. १८ ऑगस्ट रोजी सायबर चोरट्यांनी महिलेच्या मोबाइल क्रमांकावर शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत संदेश पाठविला. Share Market Fraud: महिलेने समाज माध्यमातील संदेश पाहिला. चोरट्यांनी महिलेला गुंतवणूक योजनेबाबत माहिती संदेशात दिली होती.

गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणावर परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी महिलेला दाखविले. त्यानंतर महिलेने १५ ते २० दिवसांत चोरट्यांच्या बँक खात्यात ऑनलाइन पद्धतीने ४९ लाख रुपये जमा केले. रक्कम गुंतविल्यानंतर महिलेला परतावा मिळाल्याचे भासविण्यात आले. प्रत्यक्षात महिलेला परतावा देण्यात आला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भिंगारदिवे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×