Breking News
Pune Fodder Cultivation 2026 : २५ हजार एकरांवर चारा लागवडीचे नियोजन; २२० टन बियाण्यांपैकी ८० टक्के वाटप पूर्णDeveloped Maharashtra 2030 : लोकाभिमुख प्रशासनासाठी तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रत्यक्ष क्षेत्रभेटींवर भर द्यावा – मुख्य सचिव राजेश अग्रवालFodder Shortage Maharashtra 2026 : चारा टंचाईवर मात करण्यासाठी कृषी विभाग सज्जMPSC Group C Exam 2026 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट-क परीक्षेसाठी पदसंख्येत वाढJyoti Savitri School Khanwadi : महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी वर्षे विशेष : परिवर्तनाचा नवा दीप : ‘ज्योती सावित्री’ शाळा!Birsa Munda Seva Saptah 2026 : भगवान बिरसा मुंडा गौरव दिवस सेवा सप्ताहातून आदिवासी बांधवांना योजनांचा लाभMahajyoti Pune News : महाज्योतीच्या ५१ विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची नवी भरारी!Wagholi Traffic News : वाघोली-लोहगाव चौक रस्त्यावर एकेरी वाहतूकPune Road Accident News : पुण्यात वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यूSavitri Umed Mall Pune : सावित्री-उमेद मॉल’मधून ग्रामीण महिला उद्योजकतेला मिळणार नवी दिशा

शीतल तेली – उगले यांनी स्वीकारला पुणे विभागीय आयुक्तपदाचा कार्यभार

राज्याच्या क्रीडा आयुक्तपदावरून पुणे विभागीय आयुक्तपदी नियुक्ती; प्रशासकीय अनुभवाची भक्कम पार्श्वभूमी

marathinews24.com

पुणे – भारतीय प्रशासकीय सेवेतील वरीष्ठ अधिकारी शीतल तेली- उगले यांनी विभागीय आयुक्त पदाचा कार्यभार आज स्वीकारला. २००९ च्या बॅचच्या भा.प्र.सेवेतील अधिकारी असलेल्या तेली यांचे राज्याच्या क्रीडा आयुक्त पदावरून पुणे विभागीय आयुक्त पदावर बदलीचे आदेश नुकतेच निर्गमित झाले होते. अतिरिक्त आयुक्त कविता द्विवेदी यांनी नूतन विभागीय आयुक्तांचे स्वागत केले.

विकसित महाराष्ट्राचे उद्दिष्ट गाठण्यासाठी क्षमता बांधणी आराखडा महत्त्वाचा- अपर मुख्य सचिव व्ही. राधा – सविस्तर बातमी

तेली- उगले यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कला शाखा पदवी परीक्षेत सुवर्ण पदक मिळविले आहे. त्यांनी प्रशासकीय सेवेदरम्यान २०२३ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया सरकारांनी अर्थसहाय्यित व प्रायोजित केलेल्या, ‘जलसुरक्षा’ आणि ‘वर्तुळाकार अर्थव्यवस्था’ (सर्क्युलर इकॉनॉमी) या विषयांवर ऑस्ट्रेलिया येथे आयोजित विशेष प्रशिक्षणात सहभाग घेतला.

त्यांची नागपूर जिल्ह्यात सहायक जिल्हाधिकारी म्हणून प्रशासकीय सेवेतील कारकीर्द सुरू झाली. त्यानंतर सहायक जिल्हाधिकारी चंद्रपूर, जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हाधिकारी, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त, आयुक्त वस्त्रोद्योग आणि व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य हातमाग विकास महामंडळ, सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त आणि राज्याच्या क्रीडा आयुक्त अशा विविध पदांची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे.

रायगड जिल्हाधिकारी असताना महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळल्याच्या दुर्घटनेदरम्यान प्रशासनाचे सक्षम नेतृत्व आणि ‘शोध व बचाव’ मोहिमांमधील कामगिरीबद्दल त्यांचा सन्मान झाला होता. तसेच ‘डिजिटल इंडिया सप्ताह’मध्ये तिसरा क्रमांक पटकावला.

पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त‍ आयुक्तपदाच्या कारकिर्दीदरम्यान पुणे महानगरपालिकेला ‘स्कॉच ऑर्डर ऑफ मेरिट’ आणि ‘हुडको अवॉर्ड फॉर बेस्ट प्रक्टिसेस’ (सर्वोत्तम कार्यपद्धतींसाठीचा पुरस्कार) यांसह अनेक पुरस्कार मिळाले. तसेच ‘जनाग्रह’ या अशासकीय संस्थेद्वारे करण्यात आलेल्या मूल्यमापनात, पुणे शहराला ‘शहरी प्रशासनातील सर्वोत्तम शहर’ म्हणून मानांकन मिळाले.

तेली यांच्या कार्यकाळात महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाने ‘फॅब्रिक ऑफ युनिटी’ मोहिमेचे आयोजन केले. या मोहिमेअंतर्गत खासदार, आमदार, सनदी सेवेतील अधिकारी यांच्यापासून ते विद्यार्थी, कामगार आदी ११०० हून अधिक, विणकाम क्षेत्रात नसलेल्या नागरिकांनी हातमागावर ९८ फूट लांबीचे कापड विनले. या कामगिरीची नोंद ‘आशिया अँड इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये झाली.

सोलापूर महानगरपालिका आयुक्तपदाच्या कालावधीत २०२३ मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते सोलापूर स्मार्ट सिटीला एकूण कामगिरीसाठीचा पश्चिम विभागासाठीचा ‘विभागीय स्मार्ट सिटी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. ‘पीएम स्वनिधी’ योजनेमध्ये २०२४ या वर्षात महानगरपालिकेने १२८ टक्के उद्दिष्ट साध्य केल्याच्या कामगिरीची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली. ‘मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा २०२३’ मध्ये महानगरपालिकेने दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×