Breking News
डिजिटल गोल्ड’मध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने ९४ लाखांची फसवणूकघर खरेदी करुन देण्याच्या आमिषाने ज्येष्ठाची फसवणूकPune Crime : समलैंगिक पतीकडून महिलेचा छळअनुसूचित जातींचे उपवर्गीकरण जातीय जनगणनेनंतरच करावे‘चरणसेवा’ने जपले लाखो वारकऱ्यांचे आरोग्य; ४.९६ लाखांहून अधिक वारकऱ्यांना लाभउपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते बारामती एमआयडीसीमध्ये स्वच्छता अभियानाचा शुभारंभमहिलांची सुरक्षा, सन्मान, आणि स्वातंत्र्य ही सामुहिक जबाबदारी- विजया रहाटकरपुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून १ लाखाहून थकीत कर्जदारांचा तपशील पोर्टलवर अपलोड-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीतरूणाला शेअरमधील गुंतवणूक पडली ५३ लाखांनासराईत दोन किलोमीटर पळाला, बिल्डींगवरही लपला

श्री संत सोपानकाका महाराज पालखी स्वागतासाठी माळेगाव बु. सज्ज – मुख्याधिकारी बालाजी लोंढे

श्री संत सोपानकाका महाराज पालखी

पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी माळेगाव बु. नगरपंचायत प्रशासन सज्ज

marathinews24.com

बारामती – श्री संत सोपानकाका महाराज पालखीचे माळेगाव बु. नगरपंचायत शहरात २८ जून २०२५ रोजी आगमन होणार असून पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी नगरपंचायत प्रशासन सज्ज झाले आहे, अशी माहिती मुख्याधिकारी बालाजी लोंढे यांनी दिली आहे.

पालखी सोहळा येणाऱ्या वारकऱ्यांसाठी नगरपरिषदेच्यावतीने विविध सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता नगरपंचायत युद्धपातळीवर काम करत आहे. संपूर्ण पालखी मार्गावरील रस्त्यांचे खड्डे भरणे, रस्त्यांची स्वच्छता, धूर फवारणी, सार्वजनिक शौचालय दुरूस्ती व स्वच्छता आदी कामे करण्यात येत आहेत. शहरातील सर्व पथदिवे सुस्थितीत सुरू राहतील तसेच स्वच्छ व शुद्ध पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत दक्षता घेण्यात आली आहे. शहरातील हातपंप दुरूस्त करून विंधन विहिरींचे निर्जंतुकीकरण करण्याचे काम सुरु आहे.

खेळाडूंच्या पाठीमागे राज्यशासन खंबीरपणे उभे – क्रीडा व युवक कल्याणमंत्री दत्तात्रय भरणे – सविस्तर बातमी 

पालखी मार्गावरील स्वच्छतेचे काम नगरपंचायतीमार्फत सुरु असून २६ व २७ जून रोजी नगरपंचायत, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था माळेगाव बु. आणि पोलीस प्रशिक्षण अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियानाचे करण्यात येणार आहे.

नगरपंचायत कार्यालयाशेजारी पालखी विसाव्याच्या ठिकाणी असलेले मंडप, सेल्फी पॉइन्ट, आदी आवश्यक सर्व व्यवस्था करण्यात येणार आहे. सर्व दिंड्यांना टँकरने पाणी भरण्याकरिता जलशुद्धीकरण केंद्र, माळेगाव बु. नगरपंचायत याठिकाणी सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नगरपंचायत मार्फत आपत्कालीन नियंत्रण कक्ष २४ X ७ कार्यरत ठेवण्यात येणार आहे. तसेच हेल्पलाईन क्र.०२११२-२५४००१ कार्यान्वित करण्यात आला आहे.

यंदाही ‘हरित वारी-सुरक्षित वारी’ हा उपक्रम राबविण्यात येणार असून याअंर्तगत पालखी मार्गावरील विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नगरपंचायतीचे संपूर्ण अधिकारी- कर्मचारी वर्ग पालखी नियोजनसाठी काम करीत आहे. शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयामार्फत शिबीर आयोजित करण्यात येणार असून सर्व वारकऱ्यांनी या शिबीराचा लाभ घ्यावा. प्लास्टिक मुक्त, तंबाखुमुक्त शहर ठेवण्यासाठी व सुरक्षित पालखी सोहळ्यासाठी शहरातील नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी  लोंढे यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×