पुण्यातील लष्कर भागात स्लॅब कोसळला, बांधकाम मजुर ठार

दुर्घटनेत ३ मजूर जखमी

marathinews24.com

पुणे – लष्कर भागातील नियोजित इमारतीचा स्लॅब कोसळून बांधकाम मजुराचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दि.१ दुपारी घडली. या दुर्घटनेत तीन मजूर गंभीर जखमी झाली आहेत. शुभंकर जधवा मंडल (वय २१, रा. पश्चिम बंगाल) असे मृत्यूमुखी पडलेल्या बांधकाम मजूराचे नाव आहे. चेंन्नी मंगल मुखर्जी (वय २१, रा. कोलकत्ता), वरूण (वय ३५), संन्याशी बकदी (वय २९) अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पुण्यात भरदिवसा ज्वेलर्सवर दरोडा, ५ तोळ्यांचे दागिने चोरीला – सविस्तर बातमी

लष्कर भागातील साचापीर स्ट्रीट परिसारीतल मेहेर अपार्टमेंटच्या समोरच एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. इमारतीच्या चौथ्या मजल्याचा स्लॅब टाकण्यात आला आहे. स्लॅबला लाकडी फळी, सळई लावण्यात आली आहे. मंगळवारी दुपारी मंडल, मुखर्जी, वरुण, बकदी हेचौथ्या मजल्यावर काम करत होते.

स्लॅबचा सज्जाजवळ असलेल्या सळई, तसेच फळ्यांची पाहणी करत असताना अचानक सज्जा कोसळला. चौघेजण तिसऱ्या मजल्यावर कोसळले. घटनेत चौघे जण गंभीर जखमी झाले. चौघांना तातडीने ससून रुग्णालयात नेण्यात आले. उपचारांपूर्वीच शुभंकर याचा मृत्यू झाला होता, अशी माहिती लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर यांनी दिली.

दुर्घटना घडल्यानंतर पोलीस ३ तास उशीरा पोहोचल्याचा आरोप या भागातील रहिवाशांना केला. महावीर इन्व्हेस्टर्सचे सुनील रांका यांच्याकडून या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. युवराज राऊत नावाची व्यक्ती ठेकेदार असल्याचे समजले आहे. ही घटना पोलिसांना लगेच का कळविली का नाही, याची चैाकशी केली जाईल. याप्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे असे पोलीस निरीक्षक दिघावकर यांनी नमूद केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×