Breking News
महिला पोलिसांसाठी स्वतंत्र समुपदेशन व मदत यंत्रणा उभारावी : डॉ. नीलम गोऱ्हेआदर्श शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सन्मान१४ वर्षांनंतर शिक्षक पुरस्काराची परंपरा पुन्हा सुरू; ४२ शिक्षकांचा सन्मानउधारीवर किराणा माल न दिल्याने महिलेला मारहाणमहापालिका वसाहतीतील घरातून दागिने चोरीपीएमपीचा बनावट पास तयार करुन फसवणूकहिंजवडी परिसरातील समस्या सोडविण्यासाठी हाय पॉवर कमिटीची पहिली बैठक संपन्नचाकण परिसरातील अतिक्रमण कार्यवाहीला सुरुवात; पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी करणार पाहणीउपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून पुणे जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम प्रकल्पांचा आढावाउपमुख्यमंत्र्यांकडून हिंजवडी परिसरातील नागरी व पायाभूत सुविधांच्या प्रश्नांचा आढावा

गांजा विक्रीच्या तयारीतील तस्कराला अटक

गांजा विक्रीच्या तयारीतील तस्कराला अटक

वानवडी पोलिसांची कारवाई

marathinews24.com

पुणे – गांजा विक्रीच्या तयारीत असलेल्या तस्कराला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून १६ हजार रुपये किमतीचा ८०० ग्राम गांजा, दुचाकी असा ८० हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. तौफिक रझाक शेख (वय २६, रा. मिठानगर, कोंढवा खुर्द, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मंगळवारी (दि. २३ ) रात्री उशिरा कारवाई करण्यात आली.

मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय – सविस्तर बातमी 

वानवडी पोलीस २३ सप्टेंबरला हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी तपास पथकाचे पोलीस अंमलदार विठ्ठल चोरमले व अमोल गायकवाड यांना गंगा सॅटेलाईट सोसायटी ते नेताजीनगरकडे जाणा-या रोडवरील पुलावर एकजण संशयास्पदरित्या थांबल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने धाव घेऊन माहिती घेतली. त्यावेळी अंधाराचा फायदा घेऊन आरोपी बॅग घेऊन दुचाकीवर कोणाची तरी वाट पाहत थांबला असल्याचे दिसून आले. पथकाने त्याला जागीच शिताफीने पकडुन ताब्यात घेतले. त्याने तौफिक रझाक शेख असे नाव सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता, कब्जात १६ हजारांचा ८१० ग्रॅम गांजा, दुचाकी, मोबाईल, रोकड जप्त करण्यात आली.

आरोपीविरुद्ध वानवडी पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कलम ८(क),२०(ब)(त्त्)(अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरिक्षक उमाकांत महाडिक करीत आहेत. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार डोके एपीआय उमाकांत महाडिक, पोलीस अंमलदार दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, विठ्ठल चोरमले, विष्णु सुतार, अभिजित चव्हाण, यतीन भोसले, आशिष कांबळे, अमोल गायकवाड, गोपाळ मदने, बालाजी वाघमारे, अर्शद सय्यद यांनी केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×