प्रामाणिक कार्यकर्त्याची आज समाजाला गरज – दिलीप कांबळे

दिवंगत नेते हनुमंत साठे पुरस्कार विशाल शेवाळे यांना प्रदान

marathinews24.com

पुणे – प्रामाणिकपणे समाजासाठी झटणारा,आंबेडकरी चळवळीत अहोरात्र कार्य करणारा हनुमंत साठे सारखा प्रामाणिक कार्यकर्ता आज समाजाला गरजेचा असून आजच्या विविध पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा आदर्श घेऊन कार्य करणे गरजेचे असल्याचे मत माजी मंत्री दिलीप कांबळे यांनी व्यक्त केले . आंबेडकरी चळवळीचे नेते दिवंगत हनुमंत साठे यांच्या नावे दिला जाणारा यंदाचा दुसरा हनुमंत साठे पुरस्कार डिप्रेस्ड क्लासेस मिशन संस्थेचे अध्यक्ष विशाल शेवाळे यांना आज प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते .
मातंग समाज समन्वयक पुरस्कार समिती पुणे यांच्या वतीने सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्य केल्याबद्दल विशाल भाऊ शेवाळे यांना रिपब्लिकन दिवंगत नेते हनुमंतराव साठे पुरस्कार २०२५ समितीच्या वतीने देण्यात आला.

स्वयंसेवी संस्था, कंपन्यांच्या समन्वयाने ‘सीएसआर’चा चांगला विनियोग – सविस्तर बातमी

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित आघाडीचे नेते वसंत साळवे होते .यावेळी आमदार अमित गोरखे,माजी उपमहापौर सुनीता वाडेकर ,रिपब्लिकन शहराध्यक्ष संजय सोनवणे, परशुराम वाडेकर माजी अध्यक्ष महेंद्र कांबळे, रिपब्लिकन युवा अध्यक्ष विरेन हनुमंत साठे, अशोक कांबळे, कार्यक्रमाचे संयोजक प्रकाश वैराळ, दत्ता जाधव, रवी आरडे व यासह पुणे शहरातील विविध पक्ष संघटनाचे प्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×