Breking News
Pune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेतMercedes Benz Electric GLC Chakan : महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसDr Neelam Gorhe Congress Statement : काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत महिला सन्मानाला स्थान आहे का-डॉ. नीलम गोऱ्हेBaramati Revenue Lok Adalat 2026 : प्रलंबित महसुली दावे निकाली काढण्यासाठी ३ डिसेंबर रोजी महात्मा फुले महसूल लोकअदालतPune Police Crime News : दारुच्या नशेत पुणे पोलीस आयुक्ताच्या बंगल्यात शिरण्याचा प्रयत्नAhilyadevi Holkar Karj Mukti Yojana : कर्जमुक्ती योजनेंतर्गत ४.८७ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमाPune Viman Nagar Drug Seizure : पुण्यात कॉस्मेटिक ज्वेलरीच्या दुकानातून ई-सिगारेट, हुक्का अन् गांजाची विक्रीPune Police News : पत्नीच्या इच्छेविरुद्ध केला गर्भपात, पुण्यात पोलीस उपनिरीक्षक निलंबित

सोलापूर जिल्हा परिषद सेवाकर्मी कार्यक्रमात राज्यात आदर्श ठरली

सोलापूर जिल्हा परिषद सेवाकर्मी कार्यक्रमात राज्यात आदर्श ठरली

मुख्यमंत्री यांच्या हस्ते उत्कृष्ट कार्यालय प्रमुख म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचा सन्मान; सोलापूर जिल्हा परिषदेने १०० पैकी ८० गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला

marathinews24.com

सोलापूर – महाराष्ट्र शासनाच्या १५० दिवस सेवाकर्मी कार्यक्रमाच्या गुणांकनात सोलापूर जिल्हा परिषदेने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांना आज रोजी मंत्रीमंडळ सभागृह, सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई येथे “उत्कृष्ट कार्यालय प्रमुख” म्हणून प्रशस्तिपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

पुणे ग्रामीण पोलीस दलाला ई-गव्हर्नन्स १५० दिवस कार्यक्रमात घवघवीत यश; कोल्हापूर परिक्षेत्रात प्रथम क्रमांक – सविस्तर बातमी 

जिल्हा परिषदेने सेवाकर्मी कार्यक्रमातील विविध निकषांवर १०० पैकी ८० गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला. ज्येष्ठता सूची, पदोन्नती व सरळसेवा नियुक्तीची स्थिती, बिंदुनामावली प्रमाणीकरण, अनुकंपा नियुक्ती, iGOT पोर्टलवरील प्रशिक्षण पूर्णता आणि सेवापुस्तक अद्ययावत करणे या सर्व बाबींमध्ये सोलापूर जिल्हा परिषदेने उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेचा सेवाकर्मी कार्यक्रमातील आदर्श ठसा

ग्रामविकास विभागाच्या अधिनस्त स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांचे कार्यमूल्यांकन करण्यासाठी सेवाकर्मी कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमात सोलापूर जिल्हा परिषदेने राज्यातील इतर सर्व जिल्हा परिषदांना मागे टाकत प्रथम क्रमांक मिळवला.

गुणांकन अहवालानुसार :
– ज्येष्ठता सूची : ५७ पैकी सर्व संवर्गांची अद्ययावत ज्येष्ठता सूची प्रसिद्ध (१०/१० गुण).
– पदोन्नती नियुक्ती : मंजूर ९५९ पदांपैकी ८२० कार्यरत, रिक्त पदांचे प्रमाण १४.४९% असूनही कार्यवाही उत्कृष्ट (१०/१० गुण).
– सरळसेवा नियुक्ती : मंजूर १३,००७ पदांपैकी ११,४२५ कार्यरत, रिक्त पदांचे प्रमाण १२.१६% (१०/१० गुण).
– बिंदुनामावली प्रमाणीकरण : ५७ पैकी ५५ संवर्गांची बिंदुनामावली प्रमाणित (९४.७४%) (१०/१० गुण).
– अनुकंपा नियुक्ती : उपलब्ध १६८ पदांवर सर्व नियुक्त्या पूर्ण (१०/१० गुण).
– iGOT पोर्टल प्रशिक्षण : १२,१२७ कर्मचाऱ्यांपैकी सर्वांचे रजिस्ट्रेशन पूर्ण, त्यापैकी ९५.१०% कर्मचाऱ्यांनी ५ कोर्स पूर्ण केले (१०/१० गुण).
– सेवापुस्तक अद्ययावत : १२,१२७ पैकी १२,०३९ सेवापुस्तके अद्ययावत (९९.२७%) (२०/२० गुण).

या सर्वांमुळे सोलापूर जिल्हा परिषदेने १०० पैकी ८० गुण घेऊन प्रथम क्रमांक मिळवला. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कुलदीप जंगम यांच्या नेतृत्वाखालील ही कामगिरी केवळ सोलापूर जिल्हा परिषदेपुरती मर्यादित नसून राज्यातील इतर जिल्हा परिषदांसाठीही आदर्श ठरली आहे.

“महाराष्ट्र शासनाच्या १५० दिवस सेवाकर्मी कार्यक्रमातील पारदर्शकता, शिस्तबद्धता आणि कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणावर दिलेला भर यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेने प्रशासनाच्या कार्यक्षमतेचा ठसा उमटला व राज्यात पहिला क्रमांक मिळवला. जिल्हा परिषदेने केलेली ही कामगिरी सर्व विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या सांघिक कामाचे यश आहे. हा पुरस्कार मिळाला याचा आनंद आहे, परंतु आपली जबाबदारी अधिक वाढलेली असून पुढे असेच काम करत राहू याची खात्री ही आहे.”
कुलदीप जंगम मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×