Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

दक्षिण आशियाई कराटे स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या बारामतीच्या खेळाडूंचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते गौरव

दक्षिण आशियाई कराटे स्पर्धेत चमकलेल्या बारामतीच्या खेळाडूंचा सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते गौरव

marathinews24.com

बारामती – बांगलादेशातील ढाका येथे नुकत्याच पार पडलेल्या दक्षिण आशियाई कराटे क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बारामतीतील जिल्हा क्रीडा संकुल पुणे बारामती येथे सराव करणारी श्रुती करळे आणि आयुष करळे या खेळाडूंचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

पुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेचा मानकरी ठरला मणिपूरचा अथोकपाम बाईक सिंगे – सविस्तर बातमी

यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, तालुका क्रीडा अधिकारी संतोष लवटे, महेश चावले, प्रशिक्षक रवी करळे आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांनी दोन्ही खेळाडूंचा सत्कार करून त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन केले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील या कामगिरीबद्दल कौतुक व्यक्त करत त्यांनी भविष्यातील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. सातत्यपूर्ण सराव, जिद्द आणि मेहनतीच्या बळावर अधिक मोठे यश संपादन करून देशाचे नाव उज्ज्वल करावे, असा संदेश त्यांनी वेळ दिला.

या स्पर्धेत श्रुती करळे हिने उत्कृष्ट कामगिरी करत कांस्यपदक पटकावून देशाचा गौरव वाढविला. तसेच आयुष करळे यानेही स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत उल्लेखनीय सहभाग नोंदविला.

या गौरवामुळे बारामतीतील क्रीडापटूंना प्रेरणा मिळणार असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळविणाऱ्या स्थानिक खेळाडूंच्या सन्मानामुळे क्रीडा क्षेत्राला निश्चितच नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वास श्रीमती पवार यांनी व्यक्त केला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×