अत्याचार प्रकरणाच्या तपासासासाठी विशेष तपास पथक

नसरापूर अत्याचार प्रकरण

marathinews24.com

पुणे – भोर तालुक्यातील नसरापूर अत्याचार प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे. विशेष तपास पथकात सहा अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ६५ वर्षीय नराधमाने साडेतीन वर्षांच्या बालिकेवर अत्यचार करुन निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. १ ) उघडकीस आली. या घटनेनंतर संतप्त पडसाद उमटले. ग्रामस्थांनी पुणे-सातारा महामार्गावर ठिय्या आंदोलन केले.

पुण्यातील नसरापूर प्रकरणात वेगवान न्यायासाठी विशेष प्रयत्न- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे – सविस्तर बातमी

घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी शनिवारी (२ एप्रिल) बंद पाळला. याप्रकरणात ६५ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध खून, बलात्कार, बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे. आरोपीची पार्श्वभूमी गुन्हेगारी आहे. त्याच्याविरुद्ध १९९८ आणि २०२५ मध्ये विनयभंग आणि बालकावर अत्याचार प्रकरणात (पोक्सो) गुन्हा दाखल झाला होता. या दोन्ही गुन्ह्यांत त्याची निर्दोष मुक्तता झाली होती. अटक केलेल्या आरोपीला शनिवारी विशेष न्यायाधीश एम. जी. चव्हाण यांनी ७ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

शनिवारी सायंकाळी मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. रास्ता रोको आंदोलनामुळे बाह्यवळण मार्गावरील वाहतूक चार तास ठप्प झाली होती. आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिक आणि पीडित बालिकेच्या कुटुंबीयांनी केली होती. या घटनेनंतर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पीडित बालिकेच्या कुटुंबीयांशी संवाद साधून या प्रकरणात कठोर कारवाईचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. न्याय मिळवून देण्यासाठी पोलिसांकडून सर्व प्रयत्न करण्यात येणार आहेत, असे आश्वासन पोलीस आयुक्तांनी दिल्यानंतर रात्री दहाच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.

नसरापूर अत्याचार प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली. नसरापूर अत्याचार प्रकरण संवेदनशील आहे. या प्रकरणाच्या तपाससाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे. या पथकात सहा अधिकारी असणार आहेत. त्यात दोन महिला अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे. सहा अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकातील कर्मचारी तपास करणार आहेत’, असे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी सांगितले.

नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने पाच मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात आरोपीची वैद्यकीय तपासणी करायची आहे. रासायनिक विश्लेषण तपासणी, तसेच लैंगिक सक्षमतेची चाचणी करायची आहे. आरोपीने पीडित मुलीवर यापूर्वी अत्याचार केले आहेत का, तसेच अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे केले आहेत का, या दृष्टीने तपास करायचा आहे. बालिकेला घेऊन जाताना आरोपीला साक्षीदारांनी पाहिले आहे. साक्षीदारांचे जबाब नोंदवायचे आहेत. आरोपीने बालिकेचा खून करण्यासाठी कोणते शस्त्र वापरले, आरोपीला या गुन्ह्यात आणखी कोणी मदत केली का ? अशा मुद्द्यांवर पोलिसांकडून तपास करण्यात येणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×