Breking News
पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील कार्यालयात आगपुण्यात सिमेंट मिक्सर’वाहतुकीला दोन दिवस सवलतशोभाताईंच्या कवितांमधून सकारात्मक स्त्रीजीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडतेआषाढी वारी २०२६ दरम्यान एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद‘तारपा’साठीच आमची वंशावळ-भिकल्या लाडक्या धिंडा यांची भावनापुणे जिल्ह्यातील दोन सराईत टोळ्यांविरुद्ध मोक्कापोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाणजनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाडिजीटल अटक करण्याची भीती, जेष्ठाला ११ लाखांचा गंडा

प्रकल्पांतील अडचणी दूर करून कामे गतिमान करा-मंत्री चंद्रकांत पाटील

कोथरूडमधील विविध विकासकामांचा आढावा

marathinews24.com

पुणे – राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोथरुड मतदारसंघातील विविध विकासकामांचा आढावा घेत संबंधित प्रकल्पांतील अडचणी जाणून घेतल्या. तसेच तांत्रिक व प्रशासकीय अडथळे दूर करून कामे जलदगतीने मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. आढावा बैठकीस महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, पोलीस उपायुक्त रजनीकांत चिरुमुल्ला, शहर मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

बुलेट ट्रेनने मुंबई-पुणे ४८ मिनिटांत; राज्याला जागतिक पुरवठा साखळीचे केंद्र बनवणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – सविस्तर बातमी

बैठकीत कस्पटे वस्ती, बाणेर-बालेवाडी येथील २४ मीटर व ३० मीटर रुंदीच्या रस्त्यांच्या मिसिंग लिंक, रजपूत वीटभट्टी ते मेहेंदळे गॅरेजदरम्यानचा १५ मीटरचा विकास आराखडा (डीपी) रस्ता, तसेच रजपूत वीटभट्टी ते सृष्टी लॉन्सपर्यंतचा ३६ मीटरचा डीपी रस्ता आणि पंडित जितेंद्र अभिषेकी उद्यानासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादन प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी या प्रकल्पांतील तांत्रिक अडचणींबाबतही चर्चा करण्यात आली. कोथरुड मतदारसंघातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मिसिंग लिंक प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे असल्याचे नमूद करत, त्यांतील सर्व अडथळे दूर करून प्रकल्प तत्काळ पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना पाटील यांनी दिल्या.

लोकप्रतिनिधी म्हणून या कामांसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाहीही त्यांनी अधिकाऱ्यांना दिली. पानशेत पूरग्रस्त वसाहतींसंदर्भात घेण्यात आलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी तसेच जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याबद्दल पाटील यांनी समाधान व्यक्त केले. संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करून पानशेत पूरग्रस्तांना लवकरात लवकर दिलासा द्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×