Breking News
अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची ७४ लाखांची फसवणूकगुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाची ५५ लाखांची फसवणूकपुण्यात फरार गुंडाच्या बेकायदा हाॅटेलवर बुलढोझरबळीराजाला मोठा दिलासा; शेतीकामासाठी माती, मुरूमावरील रॉयल्टी रद्दराज्य शासनाचा शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा निर्धार – विशेष लेखमहाकर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना दिलासा, लाभ मिळेपर्यंत व्याज आकारू नयेतखाजगी कृत्रिम रेतन तंत्रज्ञांना विविध सेवांसाठी प्रोत्साहनपर अनुदान लागूनाविण्यपूर्ण उपक्रमांद्वारे जादूटोणा विरोधी कायद्याची प्रचार, प्रसिद्धी कराविषमुक्त अन्नासाठी सेंद्रिय शेतीचा अवलंब गरजेचा- सभापती किरण तावरेविकसित भारत-रोजगार व आजिविका हमी अभियान (ग्रामीण) योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ

एसटी प्रवासी महिलेचे दागिने चोरीला

जुन्या वादातून तरुणावर हत्याराने जीवघेणा हल्ला

स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – एसटी प्रवासी महिलेच्या पिशवीतून मंगळसूत्र, रोकड असा ५५ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेण्यात आल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

खडकी दारूगोळा कारखान्यातील स्फोटात कामगाराचा मृत्यू – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ४१ वर्षीय महिला मूळच्या नागपूरच्या आहेत. त्या मंगळवारी (९ जून) श्रीगोंदा ते स्वारगेट या मार्गावरील एसटी बसमधून प्रवास करत होत्या. प्रवासादरम्यान त्यांच्या पिशवीतून मंगळसूत्र, रोकड असा ऐवज चोरुन नेण्यात आल्याची घटना घडली. स्वारगेट एसटी स्थानकात उतरल्यानंतर महिलेने पिशवीची तपासणी केली. तेव्हा दागिने, रोकड चोरीचा प्रकार उघडकीस आला. सहायक पोलीस निरीक्षक शिरसाठ तपास करत आहेत.

पीएमपी प्रवासी महिलेचे मंगळसूत्र चाेरी

पीएमपी प्रवासी महिलेच्या गळ्यातील एक लाख रुपयांचे मंगळसूत्र चोरुन नेण्यात आल्याची घटना छत्रपती शिवाजी महाराज रस्ता परिसरात घडली. याबाबत एका महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला हडपसर भागात राहायला आहेत. त्या मंगळवारी (९ जून) सकाळी साडेअकराच्या सुमारास पीएमपी बसने प्रवास करत होत्या. बसमध्ये गर्दी होती. चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील एक लाख रुपयांचे मंगळसूत्र चोरुन नेले. पोलीस उपनिरीक्षक माेकाशी तपास करत आहेत.

कात्रज परिसरात चोरट्यांचा उच्छाद

पुणे- कात्रज परिसरात चोरट्यांनी वेगवेगळ्या सोसायटीतील तीन सदनिकांचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने आणि रोकड असा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली. चोरट्यांनी एका ज्येष्ठ महिलेच्या सदनिकेचे कुलूप तोडून चार लाख रुपयांचा ऐवज लांबविला. याबाबत अलका उत्तम कवितके (वय ६५, रा. मनमंदिर बिल्डींग, कात्रज-कोंढवा रस्ता) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कवितके यांची सदनिका बंद होती. ८ जून रोजी मध्यरात्री चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून चोरट्यांनी साेन्याचे दागिने, रोकड असा चार लाख १० हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला.

याच भागातील दुसऱ्या एका सोसायटीत राहणारे नवनाथ साळुंखे, आदर्श सिंह यांच्या सदनिकांचे कुलूप तोडून चोरट्यांनी ऐवज चोरुन नेला. साळुंखे, सिंह यांची सदनिका बंद असल्याने नेमका किती ऐवज चोरीला गेला, याबाबतची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. मंगळवारी (९ जून) कात्रज-कोंढवा रस्त्यावरील तीन सदनिकांचे कुलूप तोडून चोरी झाल्याचे उघडकीस आल्यानंतर रहिवासी भयभीत झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. पसार झालेल्या चोरट्यांचा शो्ध घेण्यात येत असन, पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×