Breking News
पत्नीच गळा दाबुन जीवे मारण्याचा प्रयत्नमागील पाच वर्षांत टँकरद्वारे पाणीपुरवठा झालेल्या गावांचा जलयुक्त शिवार तीनमध्ये प्राधान्य मिळणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपुण्यात राहुल गांधीच्या “छात्रों की गुंज” कार्यक्रमासाठी अटी घालून परवानगीव्हाट्सएपच्या स्टेट्समुळे पुण्यात अल्पवयीन मुलाचा निर्घुन खूनकोरेगाव भीमा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा मार्ग मोकळापुण्यात आध्यात्मिक गुरहणे तरूणीचे अर्धनग्न फोटो मागून घेतलेसुकन्या समृद्धी योजनेत मुलींच्या भविष्यासाठी गुंतवणुकीचे आवाहनपिंपरी चिंचवड परिसरातील भूसंपादनाची प्रलंबित कामे ३१ ऑक्टोबर पूर्वी पूर्ण करावेतवयस्कर  शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरणाची विशेष सुविधासहकारनगरात स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; ५ महिलांची सुटका

राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचा 6 ते 8 ऑगस्ट रोजी दौरा

राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचा 6 ते 8 ऑगस्ट रोजी दौरा

6 ते 8 ऑगस्ट 2025 दरम्यान पुणे जिल्हा दौऱ्यावर

marathinews24.com

पुणे – महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ (मंत्री दर्जा) व सदस्य गोरक्ष लोखंडे (सचिव दर्जा) हे बुधवार 6 ते 8 ऑगस्ट 2025 दरम्यान पुणे जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत.

भारतातील पहिले हृदयासह मूत्रपिंड असे एकत्रित प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पिंपरीतील डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यशस्वी – सविस्तर बातमी 

बुधवार 6 ऑगस्ट रोजी अध्यक्ष व सदस्य हे आयुक्त पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या समवेत मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समस्येबाबत आढावा बैठक व दलित वस्ती, रमाई घरकुल योजनेचा आढावा व कामाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर ते झोपडपट्टी पुनवर्सन प्राधिकरणाचे अधिकारी व विकसक यांच्यासोबत झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प पात्र व अपात्र नागरिकांच्या गैरसोयीबाबत आढावा बैठक घेणार आहेत.

गुरुवार 7 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत शासकीय विश्रामगृह (आयबी) येथे जिल्ह्यातील बारामती, खेड, देहू, दौंड, चाकण, तळेगाव दाभाडे, सासवड, इंदापूर, भोर, आंबेगाव, मंचर, जेजुरी चे मुख्याधिकारी यांच्यासोबत दलित वस्ती रमाई घरगुल योजनेचा आढावा, कामाची पाहणी भेटी व तपासणी करणार आहेत.

शुक्रवार 8 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वा. ते सायं. 6 वाजेपर्यंत सर्व नगरपालिकांच्या कामांची तपासणी व सर्व नगरपालिका यांना प्राप्त होणाऱ्या महसूलांच्या एकूण 5 टक्के निधी आस्थापना वजा खर्च आर्थिक दुर्बल घटकांवर केलेल्या खर्चाची मागणी 5 वर्षाचा आढावा व कामाची तपासणी करणार आहेत. आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांना पुणे दौऱ्यादरम्यान ज्यांना भेट घ्यावयाची आहे त्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण विशाल लोंढे यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×