Breking News
पुण्यातील अनेकांची बँकखाती पोलिसांच्या रडारवरपुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेचा मानकरी ठरला मणिपूरचा अथोकपाम बाईक सिंगेकृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते देशी गोवंश प्रदर्शन व परिसंवाद कार्यक्रमाचे उद्घाटनदिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण मोहीमेअंतर्गत साडेसात हजार वृक्ष लागवडीचा संकल्पराष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांचा २३ व २४ जुलै रोजी पुणे दौरावाहने चोरणारा अल्पवयीन ताब्यात, ४ गाड्या जप्तबिटवाईज–मर्सिडीज बेंझ परिसरात उड्डाणपुलाची मागणीAjit Pawar : कष्टकर्‍यांच्या वेदनेने कळवळणारा पहाड..!दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे अभिवादनविवाहाच्या आमिषाने संगणक अभियंता तरुणीची साडेचार लाखांची फसवणूक

विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे एसआयआर मोहिमेला गती

महाविद्यालयीन विद्यार्थी गणना पत्रे तपासणी, पडताळणी, नावे शोधणे व डिजिटल नोंदणी प्रक्रियेत बजावताहेत महत्त्वपूर्ण भूमिका

marathinews24.com

पुणे – विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभत असून, गणना पत्रांची छाननी, माहितीची पडताळणी, डिजिटल नोंदणी, दस्तऐवज तपासणी तसेच २००२ च्या मतदार यादीतील नावे शोधून मतदार आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांना सहकार्य करण्याचे महत्त्वपूर्ण काम विद्यार्थी करत आहेत.

गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा आणि गर्भपात कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलीस आणि आरोग्य विभागाने कार्यप्रणाली तयार करावी- डॉ. नीलम गोऱ्हे – सविस्तर बातमी

पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या या मोहिमेत विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी निवडणूक प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली जबाबदारीने कार्यरत आहेत. प्राप्त झालेल्या गणना पत्रांवरील माहिती तपासणे, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करणे, माहिती संगणकीय प्रणालीत नोंदविणे, अर्जांचे वर्गीकरण करणे यासोबतच २००२ च्या मतदार यादीतील संबंधित मतदारांची नावे शोधून त्याची पडताळणी करण्यात मतदार व बीएलओंना मदत केली जात आहे. त्यामुळे मतदार नोंदणी आणि पडताळणीची प्रक्रिया अधिक सुलभ, जलद आणि अचूक होत आहे.

युवकांच्या सहभागामुळे मोहिमेतील कामकाज अधिक वेगाने आणि कार्यक्षमतेने होत असून, निवडणूक यंत्रणेवरील ताणही कमी झाला आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी अत्यंत जबाबदारीने आपली भूमिका बजावत असून, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून नोंदणी प्रक्रियेलाही गती देत आहेत.

लोकशाही प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी होण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये निवडणूक व्यवस्थेबाबत जागरूकता वाढत आहे. मतदार नोंदणी प्रक्रियेचे महत्त्व, अचूक मतदार यादीची आवश्यकता आणि लोकशाहीतील नागरिकांची भूमिका यांची प्रत्यक्ष माहिती विद्यार्थ्यांना या माध्यमातून मिळत आहे. त्याचबरोबर मतदारांशी संवाद साधताना त्यांच्यात नागरिक म्हणून जबाबदारीची जाणीवही अधिक दृढ होत आहे.

विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रशासन, अधिकारी, कर्मचारी, बीएलओ आणि स्वयंसेवी विद्यार्थ्यांचा समन्वय महत्त्वाचा ठरत असून, त्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे मोहिमेला अधिक गती मिळत आहे. विशेषतः २००२ च्या मतदार यादीतील नावे शोधून देण्याच्या विद्यार्थ्यांच्या कार्यामुळे मतदार पडताळणी प्रक्रिया अधिक परिणामकारक आणि सुलभ ठरत असल्याचे निवडणूक प्रशासनाने नमूद केलेआहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×