Breking News
हडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्नजणगणना करण्यासाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याचा विनयभंगहसण्यातूनच वाढेल माणसाचा ‘हॅप्पीनेस इंडेक्स’ – मकरंद टिल्लूतपास होणार नसेल तर कार्यालयाला कुलूप लावा -आमदार रोहित पवार

कमर्शियल पायलट लायसन्स सेमिनारला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कमर्शियल पायलट लायसन्स सेमिनारला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

यंग लर्नर्स एव्हिएशन अकॅडमी व बाळासाहेब देवरस एव्हिएशन गॅलरी तर्फे सेमिनारचे

marathinews24.com

पुणे – विमान वाहतूक क्षेत्रात करिअर करण्याची ही सुवर्णसंधी आहे. आज देशातील विमान उद्योग झपाट्याने प्रगती करत असून भारत त्यात अग्रेसर आहे. मात्र या क्षेत्रात कार्यरत होण्यासाठी तरुणांची संख्या कमी असल्याने भारताबाहेरील युवकांना रोजगारासाठी आमंत्रित करण्याची वेळ आली आहे, ही खेदजनक बाब आहे. त्यामुळेच आजच्या काळात विमान क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे,” असे प्रतिपादन यंग लर्नर्स एव्हिएशन अकॅडमीचे संस्थापक कॅप्टन नितीन बेंद्रे यांनी केले.

पुण्यात नवरात्रोत्सवानिमित्त प्रमुख मंदिरांच्या परिसरात वाहतूक बदल – सविस्तर बातमी 

यंग लर्नर्स एव्हिएशन अकॅडमी आणि बाळासाहेब देवरस एव्हिएशन गॅलरी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने “कमर्शियल पायलट लायसन्स” या विषयावर विशेष सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. हा सेमिनार पीएमसी मेट्रो स्टेशनजवळील एव्हिएशन अँड स्पेस गॅलरी येथे पार पडला. सेमिनारचे नेतृत्व कॅप्टन नितीन बेंद्रे यांनी केले. यावेळी यंग लर्नर्स एव्हिएशन अकॅडमीच्या संचालिका सौ. रश्मी इंदुलकर, कॅप्टन पुनीत वाखारिया, कॅप्टन अतुल वसकळे, कॅप्टन अकिन गोडेश्वर, कॅप्टन सिमरन, डॉ. सुलेखा सिंघानिया तसेच बाळासाहेब देवरस एव्हिएशन गॅलरीचे व्यवस्थापक सुजित शेंडकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कॅप्टन बेंद्रे म्हणाले, “बारावीनंतर विद्यार्थी या क्षेत्रात करिअर करू शकतात. यासाठी भौतिकशास्त्र आणि गणित हे विषय बंधनकारक आहेत. मात्र आगामी काळात कला आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठीही ही दारे खुली होणार आहेत. या क्षेत्रात प्रवेश करताना सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य. चष्मा असलेली व्यक्ती कॅप्टन होऊ शकत नाही, हा गैरसमज पूर्णपणे चुकीचा आहे. अशा अनेक गैरसमजुती दूर करून योग्य ते मार्गदर्शन यंग लर्नर्स एव्हिएशन अकॅडमीमार्फत सातत्याने दिले जाणार आहे.”

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×