Breking News
Pune Metro Line 3 : पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसादBangkok to Pune Drug Smuggling : सुकामेवा, नुडल्‍सच्‍या पॅकेटमधून हायड्रोपोनिक गांजाची तस्‍करीSafai Karmachari Issues Pune : सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न कालमर्यादेत सोडवा – भगवत प्रसाद मकवानाBaramati Youth Festival 2026 : बारामती येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात संपन्नPune Cyber Crime : एसआयआरचा फॉर्म भरण्याची बतावणीने गंडाPune Crime News : येरवड्यात घरफोडी, दीड लाखांचा ऐवज चोरीलाPune Police Constable Suspended : पुणे पोलीस आयुक्तांच्या बंगल्यात ड्रामा करणाऱ्या कर्मचाऱ्याचे निलंबनIllegal Pesticide Stock Seized Pune : पुण्यात ६५.३४ लाख रुपयांचा बेकायदेशीर कीटकनाशक साठा जप्तPune Fodder Cultivation 2026 : २५ हजार एकरांवर चारा लागवडीचे नियोजन; २२० टन बियाण्यांपैकी ८० टक्के वाटप पूर्णDeveloped Maharashtra 2030 : लोकाभिमुख प्रशासनासाठी तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रत्यक्ष क्षेत्रभेटींवर भर द्यावा – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

सीओईपीमधील वसतिगृहाची क्षमता वाढविण्याचा आराखडा सादर करा

नदी सुधार प्रकल्पाचे काम तातडीने सुरू करा – मंत्री चंद्रकांतदादा पाटील

marathinews24.com

पुणे – सीओईपी टेक्नॉलॉजिकल विद्यापीठाला स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रवेशसंख्येत वाढ होत आहे. ही बाब लक्षात घेऊन वसतिगृहाची क्षमता वाढविण्यासाठी सविस्तर आराखडा तयार करून सादर करण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले. तसेच, नदी सुधार प्रकल्पाशी संबंधित महाविद्यालयाच्या परिसरातील कामे तातडीने सुरू करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

पुण्यात पॅनेलवरील मध्यस्थांसाठी दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्न – सविस्तर बातमी

पाटील यांनी आज सीओईपीमधील मुलींच्या व मुलांच्या वसतिगृहांची तसेच नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत येणाऱ्या बोट क्लब परिसराची पाहणी करून संबंधित कामांचा सविस्तर आढावा घेतला.

यावेळी सीओईपीचे कुलगुरू डॉ. सुनील भिरुड, सीओईपी बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष विनायक पै, कुलसचिव डी. एन. सोनावणे, अभियांत्रिकी अधिष्ठाता डॉ. पराग सदगिर, विद्यार्थी संघटनेचे माजी सदस्य जगदीश कदम, डॉ. राजेंद्र हिरेमठ, भरत गिते, विवेक पवार; तसेच नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे उपअभियंता उमेश शिद्रुक आदी उपस्थित होते.

पाहणीदरम्यान कुलगुरू डॉ. भिरुड यांनी मुलींच्या वसतिगृहाची विद्यमान क्षमता ९००, तर मुलांच्या वसतिगृहाची क्षमता १,२०० असल्याची माहिती दिली. स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याने भविष्यातील गरज लक्षात घेऊन वसतिगृहाची क्षमता वाढविण्यासाठी आवश्यक आराखडा व अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश ना. पाटील यांनी दिले.

यानंतर त्यांनी सीओईपीमधील बोट क्लब परिसराची पाहणी करून नदी सुधार प्रकल्पाचा आढावा घेतला. यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पाच्या नवव्या टप्प्यातील जमीन अधिग्रहणासंदर्भातील तांत्रिक अडचणींमुळे काम स्थगित असल्याची माहिती दिली. त्यावर महापालिका आयुक्तांशी चर्चा करून संबंधित अडचणी दूर करण्यात येतील, असे सांगत प्रकल्पाचे काम कोणताही विलंब न लावता तातडीने सुरू करण्याचे निर्देश चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×