Breking News
हडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्नजणगणना करण्यासाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याचा विनयभंगहसण्यातूनच वाढेल माणसाचा ‘हॅप्पीनेस इंडेक्स’ – मकरंद टिल्लूतपास होणार नसेल तर कार्यालयाला कुलूप लावा -आमदार रोहित पवार

जिल्ह्यात युरिया खतांचा पुरेसा साठा उपलब्ध

जिल्ह्यात युरिया खतांचा पुरेसा साठा उपलब्ध

खरीप व रब्बी हंगामासाठी युरिया खतांची कोणतीही कमतरता भासणार नाही

marathinews24.com

पुणे – जिल्ह्यात युरिया खतांच्या तुटवड्याबाबत काही वृत्तसंस्थांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, सध्या जिल्ह्यात युरिया खतांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या लढ्याला यश; सुधारित ‘शक्ती कायदा’ विधेयक विधानपरिषदेत एकमताने मंजूर – सविस्तर बातमी  

हंगाम २०२५-२६ साठी जिल्ह्याला एकूण ७४,००० मेट्रिक टन युरिया खतांचे मंजूर वाटप करण्यात आले होते. त्यापैकी आजअखेर ७०,२४९ मेट्रिक टन (९५ टक्के) पुरवठा झाला असून, मागील हंगामातील १३,३४७ मेट्रिक टन शिल्लक साठाही उपलब्ध आहे. त्यामुळे खरीप व रब्बी हंगामासाठी युरिया खतांची कोणतीही कमतरता भासणार नाही, असे प्रशासनाने सांगितले आहे.

तालुकानिहाय साठा व पुरवठ्याचा तपशील पाहता, आंबेगाव, बारामती, भोर, दौंड, हवेली, इंदापूर, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, पुरंदर, शिरूर व वेल्हा या सर्व तालुक्यांमध्ये समाधानकारक प्रमाणात खत उपलब्ध आहे. काही तालुक्यांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक पुरवठा पूर्ण झाला आहे.

शेतकऱ्यांनी घाबरून न जाता आवश्यकतेनुसारच खत खरेदी करावे व अधिक साठा करून ठेवू नये, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. तसेच, खतांच्या वितरणावर प्रशासनाकडून सतत लक्ष ठेवण्यात येत असून, कोणत्याही प्रकारचा कृत्रिम तुटवडा निर्माण होऊ दिला जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×