शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आणि प्रचाराला गती देण्याचे नियोजन
marathinews24.com
पुणे – Teacher Election News : शिक्षकांचा आमदार हा शिक्षकच हवा’ ही शिवसेनेची ठाम भूमिका असून, शिक्षकांच्या प्रश्नांची जाण असलेले आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने कार्यरत असलेले सचिन सानप हे या निवडणुकीसाठी योग्य उमेदवार आहेत. गेली अनेक वर्षे सचिन सानप यांनी शिक्षकांच्या विविध अडीअडचणी, सेवाविषयक समस्या आणि प्रलंबित प्रश्नांवर सातत्याने काम केले आहे. शिक्षकांचे प्रश्न समजून घेणारा, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणारा आणि शिक्षकांच्या हक्कांसाठी विधान परिषदेत प्रभावीपणे आवाज उठवणारा प्रतिनिधी असणे आवश्यक आहे. त्यामुळे शिक्षकांच्या हितासाठी कार्यरत असलेल्या सचिन सानप यांना संधी मिळणे गरजेचे असल्याची भूमिका शिवसेना पुरस्कृत उमेदवाराच्या प्रचारार्थ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.
शिवसेना पुरस्कृत अधिकृत उमेदवार सचिन सानप यांच्या प्रचारार्थ शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, पुणे येथे शिवसेना पुणे शहरातील सर्व प्रमुख पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना आणि अंगीकृत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी या बैठकीत प्रचाराच्या नियोजनाचा आणि संघटनात्मक तयारीचा आढावा घेतला.
राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते लोकनेते एकनाथ शिंदे यांनी सचिन सानप यांना शिवसेनेचा अधिकृत पाठिंबा जाहीर केल्यानंतर त्यांच्या विजयासाठी पुणे शहरातील शिवसेनेची संपूर्ण संघटना एकजुटीने मैदानात उतरण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला. सचिन सानप यांना अधिकृत पाठिंबा दिल्याने या निवडणुकीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सचिन सानप यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपापल्या कार्यक्षेत्रात शिक्षक मतदारांशी संपर्क साधावा, त्यांच्यापर्यंत सचिन सानप यांच्या कार्याची माहिती पोहोचवावी आणि प्रचारात सक्रिय सहभाग घ्यावा, यावर बैठकीत भर देण्यात आला. शिवसेनेची संघटनात्मक ताकद आणि शिक्षकांच्या प्रश्नांप्रती असलेली बांधिलकी यांच्या बळावर विजय मिळविण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याचे निश्चित करण्यात आले.
निवडणुकीत सचिन सानप यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार पुणे शहरातील शिवसैनिक, प्रमुख पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना आणि सर्व अंगीकृत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय देणारा आणि त्यांच्या अडचणींची जाण असलेला प्रतिनिधी विधान परिषदेत पोहोचावा, यासाठी शिवसेना पुणे शहर संपूर्ण ताकदीने सचिन सानप यांच्या पाठीशी उभी राहणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
बैठकीस पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे शिवसेना पुरस्कृत उमेदवार सचिन सानप, युवासेनेचे सचिव किरण साळी, अमर घुले, युवासेना महानगर प्रमुख हेमंत बागुल, युवासेनेचे राजेश पळसकर, संदीप लोणकर, लोकसभा युवासेना संपर्कप्रमुख अविनाश खेडेकर, श्रुती नाझिरकर, उपशहरप्रमुख दत्ता खवळे, आनंद गोयल, सुनील जाधव, दीपक कुलाळ, अक्षय तारू, पंकज कोद्रे आणि सुदर्शनाताई त्रिगुणाईत यांच्यासह शिवसेना पुणे शहरातील प्रमुख पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना व सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.




















