Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

त्या आरोपीची २० वर्षांपूर्वी गावातून हकालपट्टी

नसरापूर अत्याचार प्रकरण

marathinews24.com

पुणे – साडेतीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करुन खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याच्याविरुद्ध यापूर्वी विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. कांबळेच्या विकृत मनोवृत्तीमुळे त्याला २० वर्षांपूर्वी गावातून हाकलून देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात बालिकेवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (१ मे) उघडकीस आली. ही घटना उघडकीस संतप्त पडसाद उमटले होते.

पुण्यात धावत्या कारला लागली आग; मोठी दुर्घटना टळली – सविस्तर बातमी

याप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे (वय ६५) याला अटक करण्यात आली. या घटनेचे पडसाद रविवारी (३ मे) उमटले नसरापूर परिसरातील ग्रामस्थांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. रविवारी नसरापूर भागातील नागरिकांनी बंद पाळला. या भागातील ग्रामस्थांनी निषेधाचे फलकही लावून आरोपीला फाशीची शिक्षा देऊन पीडित बालिकेला न्याय द्यावा, अशी मागणी केली. आरोपी कांबळे याच्या वर्तनामुळे त्याला गावातून हाकलून देण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला होता. भोर तालुक्यातील गावातून हाकलून दिल्यानंतर तो नसरापूर भागात राहत होता. त्याला राहायला जागा नव्हती. त्यामुळे तो बिगारी काम करायचा. घटनेच्या दिवशी पीडित बालिका एका मंदिराजवळ खेळत होती. त्यावेळी आरोपी विटा वाहण्याचे काम करत होता. आजबाजूला कोणी नसल्याची संधी त्याने साधले. त्यानंतर बालिकेला त्याने गोठ्या नेऊन अत्याचार केला. त्या वेळी गावातील वीजपुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे बंद झाले होते. मात्र, मंदिरासमोर असलेले सीसीटीव्ही कॅमेरे बॅटरीवर सुरू असल्याने गुन्हा करुन पसार झालेल्या कांबळेचा शोध घेणे शक्य झाले.

सीसीटीव्ही चित्रीकरणात आरोपी बालिकेला गोठ्याकडे नेत असल्याचे दिसून आले होते. ‘बालिका बेपत्ता झाल्यानंतर तिच्या आजीने शोध सुरू केला. त्यानंतर ग्रामस्थांनी तिचा शोध घेतला. आरोपीकडे ग्रामस्थांनी विचारणा केली. तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्यावरचा संशय बळावल्यानंतर ग्रामस्थांनी त्याला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. तेव्हा त्याने चाैकशीत गुन्ह्याची कबुली दिली. बालिकेचा मृतदेह गोठ्यात सापडला’, अशी माहिती पोलिसांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×