Breking News
हडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्नजणगणना करण्यासाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याचा विनयभंगहसण्यातूनच वाढेल माणसाचा ‘हॅप्पीनेस इंडेक्स’ – मकरंद टिल्लूतपास होणार नसेल तर कार्यालयाला कुलूप लावा -आमदार रोहित पवार

गझलविधा‌तून सकारात्मक दिशा देण्याचे कार्य-डॉ. अविनाश सांगोलेकर

गझलविधा‌तून सकारात्मक दिशा देण्याचे कार्य-डॉ. अविनाश सांगोलेकर

‌‘गझलविधा‌’ गझलसंग्रहाचे प्रकाशन

marathinews24.com

पुणे – गझलकार घडवायचे की संपवायचे अशी कंठाळी चर्चा होत असताना गझलविधा या गझल संग्रहातून सकारात्मक दिशा देणारे कार्य घडत आहे. आज नकारात्मकतेचा सूर फक्त मराठी गझल क्षेत्रातच नव्हे तर राजकारण, समाजकारण या क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात दिसून येतो. यामुळे सकारात्मकता झाकोळली जात आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ गझल अभ्यासक डॉ. अविनाश सांगोलेकर यांनी केले.

देशाला आणीबाणीपेक्षा अधिक धोका- योगेंद्र यादव – सविस्तर बातमी 

गझलविधा समूह आणि करम नियोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील निवडक गझलकारांच्या दर्जेदार गझलांचा समावेश असलेल्या ‌‘गझलविधा‌’ या प्रातिनिधिक गझलसंग्रहाचा प्रकाशन समारंभ रविवारी (दि. 21) आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी डॉ. अविनाश सांगोलेकर बोलत होते. रंगत संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर अध्यक्षस्थानी होते तर करम प्रतिष्ठानचे अध्यक्ष भूषण कटककर, गझलविधा समूह संस्थापक शाम खामकर, प्रकाशक दास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. पत्रकार भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

भूषण कटककर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाविषयी भूमिका व्यक्त करताना सांगितले की, ‌‘एल्गार‌’ या 500 गझलकारांच्या समूहातून गझलसंमेलन आयोजित करण्यात आले. त्यातूनच पुढे गझलविधा हा समूह निर्माण झाला. गझलविधा या पुस्तकातून मौल्यवान लेख आणि अनेक गझला रसिकांसमोर येणार आहेत. डॉ. सांगोलेकर पुढे म्हणाले, गझलविधा पुस्तकाद्वारे 112 गझलकारांच्या रचना आणि 16 अभ्यासपूर्ण लेख वाचकांसमोर येत आहेत. अध्यक्षपदावरून बोलताना ॲड. प्रमोद आडकर म्हणाले, गझलविधा या पुस्तकाचे अंतरंग, त्यातील लेख आणि गझला उत्तम आहेत. हा एक प्रातिनिधिक गझल संग्रह असून याद्वारे महाराष्ट्रातील अनेक गझलकारांच्या रचना समाजासमोर आल्या आहेत. गझल हा साहित्यप्रकार श्रेष्ठ असून गझलकार म्हणजे ईश्वराला पडलेले स्वप्नच होय. गझलेच्या माध्यमातून मोठा आशय अल्पशब्दात व्यक्त करता येतो. गझल मनाच्या अंतरंगातून उमटत जाते.

शाम खामकर म्हणाले, आजचा काळ, समाजमाध्यमे, वातावरण विशुद्ध नाही. अशा काळात गझलविधासारखा मौलिक ग्रंथ प्रकाशित होत आहे ही आश्वासक घटना आहे. या पुस्तकात असलेल्या गझलांद्वारे काळाचा लेखाजोखा समर्थपणे मांडला गेला आहे.
‌‘तरही गझल‌’ या स्पर्धेतील विजेत्यांचा या वेळी पारितोषिक देऊन गौरव करण्यात अला. जनार्दन म्हात्रे, प्राजक्ता पटवर्धन, प्रमोद खराडे, डॉ. स्नेहल कुलकर्णी, वैजयंती आपटे, अमिता पैठणकर यांचा सत्कार या वेळी करण्यात आला. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात निमंत्रितांचा मुशायरा आयोजित करण्यात आला होता. तीन सत्रात झालेल्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन वैजयंती आपटे, प्राजक्ता वेदपाठक, वैशाली माळी यांनी केले. आभार मुक्ता भुजबले यांनी मानले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×