Breking News
मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवातमोशी इमारत दुर्घटना: प्राथमिक पाहणीनुसार संतृप्त घनकचऱ्याच्या आडव्या दाबामुळे इमारत उलटल्याचा अंदाज‘पुनीत बालन ग्रुप’कडून आषाढी वारीतील पोलिसांना ९ हजार जीवनावश्यक वस्तूंचे किटपुण्यातून पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त मध्यरात्रीनंतर वाहतूकीत बदलपुण्यात डाॅक्टरांकडे ५० हजारांची खंडणीची मागणीविवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर‘विठू माऊली’ कार्यक्रमातून दुमदुमणार हरिनामाचा गजरपुण्यातील त्या कर्तव्यदक्ष उपनिरीक्षकाचे निलंबन मागेमोशी कचरा डेपो दुर्घटना : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी इमारतीत अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांशी साधला संवाद

महिलेचे दागिने हिसकावणारा चोरटा गजाआड

महिलेचे दागिने हिसकावणारा चोरटा गजाआड

बिबवेवाडीत गुन्हा केल्याचे उघड

marathinews24.com

पुणे – शहरातील बिबवेवाडीत पादचारी महिलेचे दागिने हिसकावून पसार झालेल्या चोरट्याला दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकाने अटक केली. मुख्तार सय्यद नूर इराणी (वय २८,रा. कदमवाक वस्ती, लोणी काळभोर, पुणे-सोलापूर रस्ता) असे अटक करण्यात अलेल्याचे नाव आहे. इराणी हा सराईत चोरटा आहे.

सोशल मीडियावर कृषी विभागात नोकरीची जाहिरात – सविस्तर बातमी 

गेल्या महिन्यात १० मे रोजी बिबवेवाडीतील लोकेश सोसायटीत परिसरात त्याने एका महिलेचे दागिने हिसकावले होते. गुन्हा केल्यानंतर तो पसार झाला होता. पसार झालेला इराणी शिवाजीनगर मेट्रो स्थानकाजवळ थांबल्याची माहिती पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळ लावून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने बिबवेवाडीत पादचारी महिलेचे दागिने हिसकावल्याची कबुली दिली. पोलीस उपायुक्त गौहर हसन, सहायक आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख, पोलीस कर्मचारी अमित गद्रे, महेश पाटील, अजित शिंदे, प्रदीप राठोड, दत्तात्रय पवार, साधना ताम्हाणे यांनी ही कारवाई केली.

घरफोडी करणारा अटकेत

भवानी पेठेतील अग्रवाल काॅलनीतील एका सोसायटीत घरफोडी करुन पसार झालेल्या चोरट्याला दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकाने अटक केली. मनीष महेंद्र काकडे (वय २९, रा. सुखसागरनगर, बिबवेवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. ११ जून रोजी अग्रवाल काॅलनीतील एका सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्याने ऐवज लांबविल्याची घटना घडली होती. या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला होता. पसार झालेला चोरटा दुचाकीवरुन पसार झाला होता. पोलिसांनी पसार झालेल्या चोरट्याचा शोध सुरू केला. १०० ते १५० ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी तपासले. पोलिसांनी काकडे याला तपास करुन ताब्यात घेतले. चौकशीत घरफाेडी करण्यासाठी काकडेने वापरलेली दुचाकी त्याच्या भावाची असल्याचे उघड झाले. त्याच्याकडील दुचकीची डिक्की तपासण्यात आली. डिक्कीत ३० हजारांची रोकड सापडली. काकडे याने चोरलेला मोबाइल संच मित्राला दिल्याचे सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×