Breking News
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील विकासकामांची केली पाहणीस्वतःचे व्हिजन ठेवा, सद्विवेकाला फॉलो करा! – तुकाराम मुंढे यांचे ‘जेन झी’ला आवाहनसाखर उद्योग ‘मल्टीप्रॉडक्ट बायोमास रिसोर्स’ म्हणून विकसित व्हावादेशाला विश्वगुरू बनवण्यासाठी वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे : सरसंघचालक डाॅ. मोहन भागवतपहिल्या टप्यात पुणे जिल्ह्यातील ३८ हजार ९७० शेतकऱ्यांची कर्जमुक्ती; ३४५.२५ कोटीचा दिलासापुण्यात पीएमपी बसच्या धडकेत दोन महिलांचा मृत्यूज्येष्ठ नागरिकाची ४ लाख ४३ हजार रुपयांची फसवणूककेंद्रीय अर्थमंत्र्यांच्या ‘डीपफेक व्हिडीओद्वारे फसवणुकगाेळीबार करुन २२ तोळ्यांच्या दागिन्यांची लुटनदीपात्रात नवजात अर्भक मृतावस्थेत सापडले

पुण्यातील कसबा पेठेत घरफोडी करणारे चोरटे गजाआड

चोरट्यांकडून १८ लाख ४९ हजारांचा मुद्देमाल जप्त

marathinews24.com

पुणे – गजबजलेल्या कसबा पेठेत सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून ११ लाख रुपयांचा ऐवज चोरून पसार झालेल्या चोरट्यांना फरासखाना पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून १८ लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

मेफेड्रोन विक्री प्रकरणात एक जण अटकेत – सविस्तर बातमी

चंंद्रकांत उर्फ चंद्या अनंत माने (वय ३३, रा. वेताळनगर, चिंचवड), रामा उर्फ रामजाने लक्ष्मण क्षीरसागर (वय ३३, रा. गौर वाघोली, ता. कळंब, जि. धाराशिव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ६ मार्च रोजी कसबा पेठेतील पवळे चौकात असलेल्या एका सोसायटीत शिरुन माने आणि क्षीरसागर यांनी बंद सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून दोघांनी सोन्याचे दागिने, रोकड असा ५० हजारांचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास केला. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. तपासात सराईत चोरटे माने आणि क्षीरसागर यांनी घरफोडी केल्याची माहिती पोलीस हवालदार गजानन सोनुने यांना मिळाली. सोनुने यांनी चित्रीकरणात आरोपींना ओळखले होते.

घरफोडी करुन दोघे आरोपी दिल्ली, आग्रा. अयोध्या, झाशी, लातूर, बार्शी येथून छत्रपती संभाजीनगरमध्ये गेले. छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर फरासखाना पोेलिसांनी दोघांना अटक केली. पोलीस उपायुक्त मिलिंद माेहिते, सहायक आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवप्रकाश मुळे, उपनिरीक्षक अरविंद शिंदे, नितीन तेलंगे, गजानन सोनुने, महेश राठोड, प्रवीण पासलकर, विशाल शिंदे, नितीन जाधव, महेश पवार, चेतन होळकर, सुमीत खुट्टे यांनी ही कामगिरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×